बिबवेवाडी : स्वारगेट वाहतुक पोलीस नियंत्रण विभागाकडून स्वारगेट चौकात बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्यांवर गुरुवारी (दि.२३) मोठी कारवाई करण्यात आली. सतत पडणाऱ्या पावसामुळे स्वारगेट चौकातील रस्त्यांमध्ये खड्ड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे या चौकात वाहतुक संथगतीने चालू असते. तसेच रिक्षा, ओला ,उबेरच्या वाहनचालकांकडून बेशिस्तपणे वाहने कुठे आणि कशीही लावली जात असल्यामुळे वाहतुक रहदारीला अडथळा निर्माण होतो.त्यामुळे या चौकात उड्डाणपुल असूनही या चौकात वाहतुक कोंडी नेहमीची झालेली आहे. वाहतुक कायद्यानुसार, व्हायलेशन झोननुसार स्वारगेट वाहतुक पोलीस विभागाकडून गुरूवारी सकाळपासून ५३ रिक्षांना जॅमर लावून कारवाई करण्यात आली. सकाळपासून झालेल्या या कारवाईमध्ये ३४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. हा सर्व दंड आॅनलाईन पद्धतीने वसूल करण्यात आला. त्यामुळे ज्या वाहनांनी आधीच्या वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे झालेल्या दंडाची वसूलीही या कारवाईत करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे, पोलीस निरीक्षक संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. ...................................................................................... नो ट्रॅफिक रूल व्हायलेशन झोन अंतर्गत स्वारगेट चौकात बेशिस्तपणे वाहन लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई चालूच ठेवणार आहे.- संपतराव भोसले, पोलीस निरीक्षक
स्वारगेट वाहतुक पोलिसांनी लावले ५३ बेशिस्त रिक्षांना जॅमर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 6:12 PM
स्वारगेट चौकात रिक्षा, ओला , उबेरच्या वाहनचालकांकडून बेशिस्तपणे वाहने कुठे आणि कशीही लावली जात असल्यामुळे वाहतुक रहदारीला अडथळा निर्माण होतो.
ठळक मुद्देसकाळपासून झालेल्या या कारवाईमध्ये ३४ हजारांचा दंड वसूलबेशिस्तपणे वाहन लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई चालूच ठेवणार