पुणे: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडीयावर व्हायरल झालेला डुग्गु आज अखरे पुणेपोलिसांना सापडला. याबद्दल त्याच्या वडीलांनी भावनिक पोस्ट केली होती. पुण्यातील बालेवाडी परिसरातून पाच ते सहा दिवसांपूर्वी चार वर्षीय डुग्गू उर्फ स्वर्णव चव्हाण (swarnav chavan) या चिमुरड्याचे झाले होते. अखरे स्वर्णम सापडल्याने त्याच्या आई-वडीलांचा आनंद गगनात मावत नव्हता. अखेर देवानेही गुड्डुच्या आई-वडीलांची आर्त हाक ऐकली आणि तो घरी परतला आहे.
स्वर्णमचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती, खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता, जवळपास ३०० ते साडे तीनशेच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते.
अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले आहे. चतुश्रृंगी पोलिसात याबाबत तक्रार आली होती, कशासाठी अपहरण केलं किंवा हा याचे कारण पोलिस शोधत आहेत. गेले आठ दिवस पोलीस सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता. अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे. कोणी अपहरण केलं? का केलं? हे मात्र अजून कळू शकते नाही, त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.