पुणे : पुण्यातील बाणेर परिसरातून पाच ते सहा दिवसांपूर्वी चार वर्षीय डुग्गू उर्फ स्वर्णव चव्हाण (swarnav chavan) या चिमुरड्याचे अपहरण करण्यात आले होते. पोलीस कसून त्याचा शोध घेत होते. अखेर हा चिमुरडा पोलिसांना पुनावळे येथे आज सापडला. जवळपास ३०० ते साडे तीनशेच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले आहे.
स्वर्णवचे अपहरण झाल्यावर सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट केल्या होत्या. पुण्यातील आई वडिलांनी देवाकडे प्रार्थना केली होती. पोलिसांनी याप्रसंगी जीव पणाला लावून त्याला शोधण्यास सुरुवात केली. शहरात असे पहिल्यांदाच घडल्याने मुलांबाबत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चाही लोकांमध्ये सुरु झाली होती. फेसबुकच्या माध्यमातून तो लवकरात लवकर सापडावा अशा पोस्टचा वर्षाव सुरु झाला. हीच अनोखी ताकद पोलिसांना मिळाली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांनी स्वर्णवच्या आई वडिलांचे नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम आई वडिलांना मुले नेहमीच सुरक्षित असतील. असे डुग्गूच्या शोधमोहीमेतून करून दाखवले आहे.
शोधमोहिमेत जवळपास ३०० ते ३५० वर पोलीस कर्मचारी व अधिकारी
स्वर्णवचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती, खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता, जवळपास ३०० ते साडे तीनशेच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले आहे.
कोणी अपहरण केलं? का केलं? याचा तपास सुरु
चतुश्रृंगी पोलिसात याबाबत तक्रार आली होती, कशासाठी अपहरण केलं किंवा हा याचे कारण पोलिस शोधत आहेत. गेले आठ दिवस पोलीस सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता. अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे. कोणी अपहरण केलं? का केलं? हे मात्र अजून कळू शकते नाही, त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.