ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निकालात दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर यांच्या पॅनेलला बहुमत मिळू शकले नव्हते. ११ पैकी ६ जागांवर विरोधक आघाड्या, तर ५ जागांवर दरेकर यांच्या रायरेश्वर पॅनेलचे उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे सरपंच नक्की कोणाचा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे व पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर एकत्र आल्याने त्यांनी एकत्रित सत्ता स्थापन केली.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सरपंच पदाच्या निवडीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दादा लोणकर, ग्रामसेवक एल. आर. बाचकर, गावकामगर तलाठी परदेशी यांनी काम पाहिले. निवडणुकीस सदस्य काजल विशाल म्हेत्रे, अर्चना विठ्ठल म्हेत्रे, सारिका सुशील कांबळे, स्वाती अविनाश होले बापू दगडू थोरात, सविता बापूसाहेब मेहेर, प्रियांका राजेंद्र माकर, सीताराम पोपट वेताळ, रोहित म्हेत्रे, मीना चांगदेव म्हेत्रे व बंडू गायकवाड उपस्थित होते.
सरपंचपदासाठी स्वाती अविनाश होले व प्रियांका राजेंद्र माकर यांनी अर्ज दाखल केले होते. यातील स्वाती होले यांना ६, तर प्रियंका माकर यांना ५ मते मिळाली. यात स्वाती होले एका मताने विजयी झाल्या. उपसरपंचपदासाठी रोहित मोहन म्हेत्रे व प्रदीप वसंत गायकवाड यांनी अर्ज दाखल केले होते. यातील रोहित म्हेत्रे यांना ६, तर प्रदीप गायकवाड यांना ५ मते मिळाल्याने म्हेत्रे एका मताने विजयी झाले.
माजी सरपंच राजेंद्र रामदास म्हेत्रे व सुधीर रामचंद्र दरेकर यांच्या मध्यस्थी मुळे गावात कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे व यशवंत साखर कारखान्याचे माजी संचालक सुनील दरेकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर यांच्यात समझोता होऊन एकत्रित सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रायरेश्वर पॅनेलचे ५ व जनसेवा पॅनेलचा एक असे सहा सदस्य एकत्रित येत त्यांनी सत्ता स्थापन केली.
सरपंच व उपसरपंच निवडी नंतर दत्तात्रय थोरात, सुनील म्हेत्रे, रमेश म्हेत्रे, उमेश म्हेत्रे, नीलेश म्हेत्रे, सदानंद बालगुडे, मनोज म्हेत्रे, संजय म्हेत्रे, अर्जुन शिवरकर, राजेंद्र म्हेत्रे, सुरेश थोरात, सुनील जगताप, नितीन शिंदे उपस्थित होते.
फोटो ओळ : सरपंचपदाच्या निवडीनंतर जल्लोष साजरा करताना माजी उपसभापती सुशांत दरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे व प्रमुख कार्यकर्ते.