खेड तालुक्यातील आळंदीलगत असलेल्या वडगाव-घेनंद गावच्या पश्चिमेला वनपरिक्षेत्रातील घनदाट झाडीत स्वयंभू शिवलिंग आहे. विशेष म्हणजे हे स्वयंभू शिवलिंग पांडवकालीन असून, पौराणिक वारसा लाभलेले स्थळ आहे. अनेक वर्षे साध्या मंदिरात शिवलिंगाची पूजाअर्चा केली जात होती. कालांतराने महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार करून परिसराचे सुशोभीकरण केले आहे. सद्यस्थितीत घनदाट झाडीत वसलेले हे पुरातन मंदिर भाविकांना खुणावत आहे. दरम्यान अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्त शेकडो भाविकांनी तीर्थक्षेत्र बेली येथील महादेवाचे दर्शन घेतले. या वेळी नियमांचे पालन करून केळी व दुधाचा प्रसाद म्हणून भाविकांना वाटप करण्यात आले.
फोटो ओळ : वडगाव घेनंद (ता. खेड) येथील तीर्थक्षेत्र बेलीतील फुलांच्या सजावटीतील स्वयंभू शिवलिंग. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)