शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

स्वच्छतेची शपथ, जनजागृतीपर फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 1:18 AM

जयंती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

पिंपरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शाळा, महाविद्यालये, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांतर्फे विविध कार्यक्रमांचे, जनजागृतीपर प्रभातफेरीचे आणि विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता पाळण्याची शपथ घेऊन साफसफाई करण्यात आली. या दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.पिंपळे गुरव : दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळच्या सत्रात कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी सर्व वर्गखोल्या स्वच्छ केल्या. त्याचबरोबर इमारतीतील जिने व कोपरे पाण्याने धुऊन स्वच्छ केले. उपप्राचार्य रजनिकांत पतंगे, शालिनी सहारे, संध्या हिंगे, अरुणा खलाटे यांच्यासह सर्व प्राध्यापक यात सहभागी झाले होते. गांधीवादी विचारवंत सुभाष बोधे, प्राचार्य रामचंद्र गोंटे, जनता शिक्षण संस्थेचे सचिव सुभाष गारगोटे, पर्यवेक्षक पद्माकर महाजन यांनी शुभेच्छा दिल्या. दुपारच्या सत्रात बाळासाहेब भोसले व अनिल भोसले या शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी शालेय परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर प्रशालेच्या स्काऊट-गाईड व सांस्कृतिक विभागाने सर्वधर्म प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदन, गुरुमहिमा याबरोबर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्ध धर्माच्या प्रार्थनांचे पठण केले. या वेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. ज्येष्ठ शिक्षिका कल्याणी कुलकर्णी, उपप्राचार्याअंजली घोडके यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे विचार विद्यार्थ्यांना ऐकविले. रामदास पोळ यांनी सूत्रसंचालन केले. अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. संतोष शिंदे यांनी आभार मानले.

पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वंचितांच्या शाळेत आदिती निकम यांनी स्वच्छता अभियान राबविले.चंद्रभागा भोसले प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस स्वीकृत सदस्य संजय कणसे, मदन कोथोले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंदिर परिसराची स्वच्छता

सांगवी : जुनी सांगवीतील आनंदनगर मित्र मंडळाकडून महात्मा गांधी जयंतीनिमित्त गणेशा ढोल-ताशा पथकाचे अध्यक्ष लिओ जुल्स यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात शक्तिस्थान चतु:शृंगी देवस्थान येथे परिसर स्वच्छ व कचरा व्यवस्थापन राबविण्यात आले.चतु:शृंगी देवस्थानच्या आरोग्य विभागाकडून झाडू आणि सुरक्षेसाठी तोंडाला बांधायला मास्क उपलब्ध करून देण्यात आले. देवीच्या गाभाऱ्याची सर्व साफसफाई पद्मजा कुलकर्णी यांनी केली. अतुल भोसले, दिनेश ढोरमले, अक्षय कोकाटे, अजय टेके, रोहित समेल, मयूर देशमुख, कविता, शिवानी, जयश्री, रोहन आणि इतर ५० ते ६० पथकांच्या सभासदांच्या सहकार्याने मंदिराजवळील परिसर स्वच्छ केला. या वेळी ५ बॅग ओला कचरा आणि ११ बॅग सुका कचरा गोळा करून तो कचरा सरकारी आरोग्य खात्याकडे सोपवून योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. गणेश मंडळाकडून करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले.

फलकांतून स्वच्छतेबाबत जनजागृतीजाधववाडी : जगन्नाथ तुकाराम राऊत प्राथमिक आणि ज्ञानज्योती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अभिजित राऊत यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

शाळेचे संस्थापक दिलीप राऊत यांनी मुलांना मार्गदर्शन केले़ अन्य सर्व शिक्षकांनी मुलांना महात्मा गांधी यांनी देशासाठी केलेल्या कार्याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमानिमित्त शाळेतील सर्व मुलांनी स्वच्छता अभियानांतर्गत आसपासचा परिसर स्वच्छ केला. स्वच्छतेचे फलकांद्वारे विद्यार्थ्यांतर्फे महत्त्व सांगितले गेले. विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.

वाल्हेकरवाडीत जनजागृती फेरीरावेत : ज्या ठिकाणी स्वच्छता असते तेथे सरस्वती आणि लक्ष्मी या दोघी नांदतात. त्याकरिता आपला परिसर, वर्ग स्वच्छ राहील याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी. कचरा कुठेही न टाकता योग्य त्या जागेवर टाकावा़ आपण राहतो तो परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आरोग्य नांदेल, असे मत रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी व्यक्त केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रावेत येथे रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी आणि क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान आणि जनजागृती फेरी यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाल्हेकर बोलत होते. स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ ठेवा परिसर आपला अशा घोषणा देऊन शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. मुख्याध्यापक अरविंद तांबे, उपमुख्याध्यापक आशा पालवे, सोमनाथ हरपुडे, सुभाष वाल्हेकर, गणेश बोरा, युवराज वाल्हेकर, प्राजक्ता रुद्रावर, केतकी नायडू आदी या वेळी उपस्थित होते.विद्यार्थी : जुनी सांगवीत सामूहिक स्वच्छतापिंपळे गुरव : जुनी सांगवीतील नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सामुदायिक स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसर, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंची साफसफाई केली. महात्मा गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती दिली. दहावीतील अभिज्ञा दीक्षित हिने महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्याची संकल्पना सांगितली. महात्मा गांधींनी संपूर्ण आयुष्यभर सत्य व अहिंसा या तत्त्वांचा अवलंब केला. संपूर्ण जगाला अहिंसेचा मार्ग दाखवला, असे प्राचार्य सुरेंद्रनाथ वरुडे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे