वारजे : दिवाळीच्या सहाव्या व सातव्या दिवशी साजरी होणाऱ्या छटपूजेचे कर्वेनगर, वारजे, शिवणे, उत्तमनगर व खडकवासला धरण परिसरात बुधवारी पहाटे उगवत्या सूर्याला नमन करून समापन करण्यात आले. याबरोबरच व्रतधारी महिलांचा दोनदिवसीय उपवास देखील संपुष्टात आला.
कर्वेनगर येथील स्मशानभूमीजवळ श्री विश्वकर्मा ट्रस्टच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांत हजारो उत्तर भारतीय महिलांनी कुटुंबीयांसह सूर्यदेवाला अर्ध्य देऊन नमन केले. या ठिकाणी विशेष शामियाना उभारण्यात आला. भाविकांच्या सोयीसाठी प्रकाश व्यवस्था, ध्वनिक्षेपक व स्पीकर्सचीदेखील सोय करण्यात आली होती. या ठिकाणी नदीपात्रात पाणी किनाºयापासून दूर असल्याने व तिथे मोठ्याप्रमाणात झाडे झुडपे वाढली असल्याने मोठ्या हौदात टँकरने पाणी आणून पूजेसाठी भाविकांची पाण्याची सोय करण्यात आली होती. या आयोजनात अध्यक्ष खुशीलाल शर्मा, लालप्रसाद शर्मा, शत्रुघ्न शर्मा, राकेश शर्मा, उपेंद्र शर्मा, हरीनारायण शर्मा, जितन शर्मा, रामभारोस राऊत, पप्पू शर्मा, वकील साहनी रामबालक शर्मा, शंभू मोरया, गौरीशंकर ठाकुर, विजय ठाकुर, सत्यनारायन ठाकुर यांनी सहभाग घेतला. या ठिकाणी लोकवर्गणी काढून आयोजन करण्यात येत असल्याने पालिकेतर्फे अधिकची सोयी सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा आयोजकांनी केली. नगरसेवक राजाभाऊ बराटे, लक्ष्मी दुधाने, शिवराम मेंगडे, माणिक दुधाने, दत्तात्रय चौधरी यांनी उपस्थिती लावली.
वारजे येथील स्मशानभूमीजवळील नदीपात्रात तसेच गणपती माथा भागातील नदीपात्रात देखील उत्तर भारतीय नागरीकांनी मोठ्या प्रमाणात छटपूजा साजरी केली. या ठिकाणी देखील मंगळवारी संध्याकाळी व बुधवारी भल्या पहाटे सुरयदेवळा अर्ध्या देऊन नमन करण्यात आले.छटपूजेवर निवडणुकीचे सावटवारजे, कर्वेनगर, शिवणे, खडकवासला धरण परिसरात यावर्षी छटपूजेनिमित्त मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स बाजी करण्यात आली होती. त्यामुळे पुढील वर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीचे सावट या पूजेनिमित्त जमलेल्या उत्तर भारतीय भाविकांना दिसून आले. कधी नव्हे ते आजी व भावी खासदार, आमदार व नगरसेवक देखील हसतमुख चेहºयाने जमलेल्या भाविकांना हिंदीतून शुभेच्छा देत होते.