शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

'स्वाइन फ्लू वाढल्याने लशी मागविणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 3:33 AM

पुणे : स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधक लशी मागविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या लशी उपलब्ध नसून केवळ स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांनाच टॅमी फ्लू या गोळ्या दिल्या जात आहेत. नागरिकांनी योग्य प्रकारे दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.मागील महिनाभरात स्वाइन फ्लूची लागण झाल्याने ३ ...

पुणे : स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधक लशी मागविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या लशी उपलब्ध नसून केवळ स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांनाच टॅमी फ्लू या गोळ्या दिल्या जात आहेत. नागरिकांनी योग्य प्रकारे दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मागील महिनाभरात स्वाइन फ्लूची लागण झाल्याने ३ महिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच, संशयित रुग्णांचा आकडाही दिवसागणिक वाढत चालला आहे. सध्या शहरात स्वाइन फ्लूचे ३८ रुग्ण असून जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल ५ लाख ६५ हजार ६३९ जणांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी ५ हजार ४१० संशयित रुग्णांना टॅमी फ्लू या गोळ्या सुरू करण्यात आल्या आहेत. स्वाइन फ्लू झालेल्या १४ रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांपैकी १० जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर, आतापर्यंत २१ जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. काही दिवसांपासून स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. या रुग्णांना लगेच टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या जात आहेत. गर्भवती महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना स्वाइन फ्लूची लागण होऊ नये म्हणून लशी दिल्या जातात; परंतु सध्या त्या लशींचा साठा उपलब्ध नाही.राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेने (एनआयव्ही) ‘क्वॉड्रीव्हेलेंट’ ही नवीन लस वापरण्यास सांगतिले आहे. यापूर्वी दुसरी लस दिली जात होती. या लशी पालिकेने आधीही घेतल्या आहेत. आता नव्याने सुमारे ५ हजार लशी मागविण्यात येणार आहेत. त्या महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील. ही खूप महाग असली तरी मागविली जाणार आहे. या लशी पुरेशा नसल्या तरी नागरिकांनीही हे आजार टाळण्यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे.- डॉ. अंजली साबणे, सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लू