पिंपरी : स्वाइन फ्लूचा विळखा वाढतच चालला असून, या आजारामुळे आणखी एका रुग्णाचा मंगळवारी (दि. ८) मृत्यू झाला आहे. जानेवारीपासून तब्बल ३२ जणांना प्राण गमवावे लागले असल्याने या आजाराच्या नियंत्रणाचे आव्हान वैद्यकीय विभागासमोर उभे आहे.अकोले (जि. अहमदनगर) येथील रहिवासी असलेल्या ६२ वर्षीय व्यक्तीला ३१ जुलै रोजी चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ८ आॅगस्टला उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आणखी चार रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.सोमवारी ३६९२ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, ३२६ जणांना खोकला, सर्दी व तापसदृश आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ३९ रु ग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या असून, नऊ रुग्णांच्या घशातील द्रव नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात दहशत पसरवणाºया एच १ एन १ अर्थात स्वाइन फ्लूचा ज्वर दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. सातत्याने वाढणाºया या आजाराला आळा घालण्यासाठी आरोग्ययंत्रणांचे युद्धपातळीचे प्रयत्न सुरू असले, तरी दररोज नव्या रुग्णांना आजाराची बाधा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यासह स्वाइन फ्लूच्या मृत्यूची संख्याही सातत्याने वाढती असल्याने शहरात गांभीर्याची स्थिती निर्माण झाली आहे.जास्त धोका कोणाला?विशेषत: २ वर्षांपेक्षा लहान मुलांना स्वाईन फ्लू होण्याची शक्यता अधिक असते.६५ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असणाºयांना स्वाईन फ्लू होण्याचा धोका असतो.प्रसूतीपूर्वी २ आठवडे या काळात गरोदर स्त्रियांना, त्याचबरोबर गर्भपात झालेल्या स्त्रियांनी देखील सावध राहणे आवश्यकअस्थमा, हृदयविकार, मधुमेह, किडनीचे आजार, यकृत किंवा रक्ताचे आजार असलेल्यांना स्वाइन फ्लूचा धोका असतो.
स्वाइन फ्लूचा वाढतोय विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:39 AM