पुणे : स्वाईन फ्लुला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अतिजोखमीच्या व्यक्तींना लस दिली जाते. यावर्षी दि. १ जानेवारी ते १९ आॅक्टोबर या कालावधीत सुमारे १ लाख २८ हजार व्यक्तींना ही लस देण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा जवळपास तिप्पट आहे. गर्भवती महिला, मधुमेह आणि उच्चरक्तदाब असणाऱ्या व्यक्तींसह स्वाईन फ्लुच्या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश अतिजोखमीच्या व्यक्तींमध्य होतो. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने त्यांना स्वाईन फ्लुची लस मोफत दिली जाते. या लसीमुळे स्वाईन फ्लुचा धोका टळतो. स्वाईन फ्लुची लागण झालेल्या रुग्णांमध्ये या व्यक्तींचा समावेश अधिक आहे. आरोग्य विभागाकडून २०१५-१६ मध्ये १ लाख १ हजार ३५६ अतिजोखमीच्या व्यक्तींना ही लस देण्यात आली होती. तर दि. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत ४२ हजार ४९२ जणांचे लसीकरण करण्यात आले. मागील काही महिन्यांत पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिकसह राज्यात अनेक भागात स्वाईन फ्लुचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक लस दिली जात आहे. त्यामुळे दि. १ जानेवारी ते दि. १९ आॅक्टोबर अखेरपर्यंत १ लाख २८ हजार २६ जणांना लस देण्यात आली आहे. ही लस मोफत आणि ऐच्छिक असून यापुढील काळातही संबंधितांना दिली जाणार आहे. दरम्यान, राज्यात स्वाईन फ्लुवरील आॅसेलटॅमीवीर औषधे आणि इतर साधनसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. स्वाईन फ्लुवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.-------------राज्यात २६२ जणांचा मृत्यूमागील काही दिवसांपासून स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या कमी होत चालल्याचे आरोग्य विभागातील अधिकाºयांनी सांगितले. राज्यात दि. १९ आॅक्टोबरअखेरपर्यंत स्वाईन फ्लुने २६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ हजार ९६ रुग्णांना स्वाईन फ्लुची लागण झाली. त्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड व नाशिकमधील रुग्णांचा समावेश आहे.
स्वाईन फ्लु प्रतिबंधक लस सव्वा लाख जणांना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 9:35 PM
मागील काही महिन्यांत पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिकसह राज्यात अनेक भागात स्वाईन फ्लुचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक लस दिली जात आहे.
ठळक मुद्देस्वाईन फ्लुची लागण झालेल्या रुग्णांमध्ये या व्यक्तींचा समावेश अधिक या लसीमुळे स्वाईन फ्लुचा धोका टळतो१ जानेवारी ते १९ आॅक्टोबर या कालावधीत सुमारे १ लाख २८ हजार व्यक्तींना ही लस राज्यात स्वाईन फ्लुवरील आॅसेलटॅमीवीर औषधे आणि इतर साधनसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्धराज्यात दि. १९ आॅक्टोबरअखेरपर्यंत स्वाईन फ्लुने २६२ जणांचा मृत्यू