कळस : कळस (ता. इंदापूर) येथील डोंबारी समाजातील सोपान शिंदे यांचा ४ सप्टेंबर रोजी येथील पाण्याच्या बारवमध्ये पडून पोहायला येत असतानाही रात्री उशिरा गूढ मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली. तरी त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी यासंदर्भात बरेचशे मुद्देही मांडले आहेत.संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पोलीस यंत्रणा मात्र चौकशीस टाळाटाळ करीत आहे. लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवचिकित्सा करण्यात आली व त्याचे दफनही करण्यात आले. मात्र तो गावाशेजारील बारवकडे का गेला, बारवमध्ये कसा पडला व त्याला पोहायला येत असतानाही तो का बुडाला, असे अनेक मुद्दे आहेत. याबाबत त्यांचा भाऊ चंदर शिंदे यांनी सांगितले, की आम्ही दबावाखाली आहोत. आम्हाला तक्रार करू नका, असे काहींनी सांगितले. त्यामुळे आम्ही सहकार्य नसल्यामुळे गप्प बसलो आहोत. तो मुका होता, त्याला बोलता येत नव्हते.मात्र तो हुशार होता, मोलमजुरी करायचा व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, असे शिंदे यांनी सांगितले. त्याच्या पाठीमागे पत्नी व ६ मुले असून, ती उघड्यावर पडली आहेत.रोजच्या अन्नाची भ्रांत होती आणि त्यासाठी जीवनाचा संघर्ष त्याच्या पाचवीलाच पुजला होता. कठोर मेहनत करण्याशिवाय त्याच्याकडे कोणताच पर्याय नव्हता, असेही चंदर शिंदे यांनी सांगितले.पोलिसांना पाझर फुटेनासोपानला पोहायला येत होते. अशा स्थितीत तो विहिरीत कसा पडला, वर्दळ असताना त्याला कोणी का पाहिले नाही, असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून, हे गूढ उकलण्यासाठी पोलीस सहकार्य करीत नाहीत. पोलिसांना गाºहाणे घातले तरी पाझर फुटला नाही.
पोहता येत होते, मग बुडून मृत्यू कसा? नातेवाईकांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 2:30 AM