आणि पराभूत झालेल्या २४ ग्रामपंचायतीमधील १२६ ग्रामपंचायत सदस्यांसह इतरांवर अपात्रतेची टांगती तलवार उभी आहे.जिल्हाधिकारी यावर काय निर्णय देणार याकडे सर्वाचे लक्ष असून यामुळे सदस्यांचे भवितव्य धोक्यात येऊ
शकते.
५ जानेवारी रोजी भोर तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींमधील ६६५ जागांसाठी निवडणूक झाली होती. निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर कारायचा असतो. ज्या निवडून आलेल्या सदस्यांनी व पराभूत झालेल्यांनी सादर केला नाही. ती नावे तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली आहेत. जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.
उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक उमेदवाराला प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. त्यामध्ये शेवटी निवडणूक खर्चाचा तपशील याचा स्पष्ट उल्लेख केलेला असतो. निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या कालावधीमध्ये निवडणूक खर्चाचा तपशील (हिशोब) विहित नमुन्यात सादर न केल्यास ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व अपात्र होऊ शकते, तर निवडून आले नाहीत त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवता येणार
नाही. दरम्यान, भोर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींमधील १२६ निवडून आलेल्या सदस्यांनी खर्चाचा तपशील उपकोषागार कार्यालयाकडे सादर केला नाही. निवडणुकीसाठी उमेदवारांना विविध प्रकारचे खर्च करावे लागतात या सर्व खर्चाचा हिशोब त्याच्या प्रतिनिधीने दररोज सकाळी उपकोषागार कार्यालयात सादर करणे बंधनकारक होते. उपकोषागार कार्यालयात त्याची छाननी झाल्यानंतर त्याचा अहवाल तहसील कार्यालयात पाठवला जातो. तिथून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येतो.
परंतु अनेक उमेदवार या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. निवडणूक झाल्यानंतर सर्व खर्च एकदम सादर करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र निवडणुकीला तीन महिने होत आले तरीही अनेक उमेदवारांनी खर्च सादर केलेला नाही. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित उमेदवारांना नोटिसा देण्यात येणार असून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाल्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे. यामुळे खर्चाचा तपशील सादर न केलेल्या सदस्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार उभी राहणार आहे.
खर्चाचा हिशेब सादर न केलेल्या गावांची यादी
वेनवडी (३),वर्वे बुद्रुक (८),वर्वे खुर्द(५),पोम्बर्डी (३)
न्हावी १५ (२),न्हावी ३२२ (१),हातवे बुदुक (६),हातवे खुर्द (३),न-हे(३),संगमनेर (५),बालवडी (७),दिवळे (७),शिवरे (४),नसरापूर (५),गोरड म्हशीवली (२),बारेबुदुक (७),वेळु (३),कामथडी (४),उंबरे(५),खोपी (१)निगडे (३),कांजळे (४),मोहरीखुर्द (२),नाझरे(३),देगाव (५),बाजारवाडी(१) खानापुर (१),जोगवडी,(२),माझगाव (४),केळवडे (३),पाले (१),भोंगवली (१),राजापूर (१),रांजे (३),कापुरव्होळ (१),पेंजळवाडी (५) अशी एकूण १२६ जण आहेत.
ज्या सदस्यांनी दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नाही, अशांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आली आहेत. त्यांना सुनावणीची संधी देण्यात येईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम निर्णय घेण्यात येईल.
अजित पाटील, तहसीलदार, भोर