पुणे: मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चापुणे जिल्हा यांच्या वतीने येत्या गुरुवारी दि.१४ बाबूगेनू चौक, टिळक पुतळा, मंडई येथे सकाळी ११ लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. बालेवाडी, औंध, आणि म्हाळुंगे या भागात याच दिवशी बंद पुकारण्यात आला आहे., अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी तुषार काकडे प्रशांत धुमाळ बाळासाहेब आमराळे अमर पवार, सचिन आडेकर, युवराज दिसले, गुलाबराव गायकवाड श्रुतिका पाडळे आदी उपस्थित होते.
जालना येथील मनोज जरंगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत आहे. त्यांनी राज्य सरकारकडे मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, आंदोलकवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. या मागण्या केल्या आहेत. त्याचा शासनाने गंभीरपणे विचार करून निर्णय घ्यावा. या आंदोलनात आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष पणे लाठीमार ची चौकशी करून तातडीने दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर यांनी केली.