पुणे : मन हे हार्मोनल आरोग्याचा एक महत्त्वपूर्ण नियंत्रक आहे. म्हणूनच उच्च रक्तदाब आणि मधुमेह आदी विकारांना दूर करण्यात मनाच्या अवस्थेची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये या बाबीकडे अद्याप लक्ष दिले गेले नाही, हे लक्षात घेऊन स्फियर, सेंटर ऑफ बिहेव्होरल मेडिसिन (सीबीएम), इंडोक्रिन सोसायटी ऑफ इंडिया (ईएसआय) आणि इंडियन सायकायट्रिक टास्क फोर्स इन माइंड बॉडी मेडिसिन (एमबीएम) यांच्या वतीने डॉक्टरांना शिक्षित करण्यासाठी माईंड बॉडी मेडिसिन या विषयावर येत्या २७ व २८ मार्च रोजी ‘सिनॉप्स २०२१’ ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. ‘बिहेव्हेरल अँड नॉन फार्मालॉजिकल इंटरव्हेन्शन इन डायबेटिज’ ही परिषदेची संकल्पना असल्याचे आयोजक अध्यक्ष डॉ. वैशाली देशमुख यांनी सांगितले.
‘सिनॉप्स’ परिषद २७ व २८ मार्चला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 4:11 AM