पुणे : फरुखाबाद घराण्याचे उत्तम तबलावादक आणि थिरखवा शैलीचे गाढे अभ्यासक पं. नारायणराव जोशी यांचे बुधवार (दि. २९ नोव्हेंबर) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. प्रसिद्ध गायक आणि व्हायोलिनवादक कै. गजाननबुवा जोशी यांचे ते सुपुत्र. उस्ताद अहमदजान थिरखवा यांचे अगदी जवळचे शिष्य. अगदी पूर्वी गुरुगृही राहून सर्व शिक्षा संपादन करणे ही परंपरा होती. त्याच पद्धतीने नारायणराव जोशी यांनी अनेक वर्ष उ. अहमदजान थिरखवा यांच्याकडे राहून तबल्याचे शिक्षण घेतले. गुरुंनी दिलेला सर्व तबला मुखोद्गत असायचा. बरोबरच्या शिष्य मंडळींना एखादी गोष्ट अडली, की ते नारायण जोशींना त्याचा संदर्भ विचारायचे. यामुळे थिरखवा शैली त्यांनी उत्तम आत्मसात केली, ती शैली ते जगले. थिरखवा साहेबांच्या मुखात अल्लाह अल्लाह नामाइतकेच नारायण नारायण हे नाव असायचे.
विद्वान तबलावादक, थिरखवा शैलीचे अभ्यासक पं. नारायण जोशी यांचे पुण्यात निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:52 AM
फरुखाबाद घराण्याचे उत्तम तबलावादक आणि थिरखवा शैलीचे गाढे अभ्यासक पं. नारायणराव जोशी यांचे बुधवार (दि. २९ नोव्हेंबर) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले.
ठळक मुद्देउ. अहमदजान थिरखवा यांच्याकडे राहून घेतले तबल्याचे शिक्षणनारायणराव जोशी होते उस्ताद अहमदजान थिरखवा यांचे जवळचे शिष्य