पुणे : जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे मनपा शिक्षण मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात डीएव्ही संघाने रविवारी विजेतेपद पटकावले. प्रभात रस्त्यावरील सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटरमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. अंतिम फेरीत अपर्णा शाळीग्राम, अंकिता मुंडे आणि अर्चिता अंजन यांच्या कामगिरीच्या जोरावर डीएव्हीने संस्कृती संघाला ३-१ने पराभूत केले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत सेवासदनने महेश विद्यालयावर ३-१ने सरशी साधली.निकाल :उपांत्य फेरी : डीएव्ही विवि सेवासदन : ३-२ (अपर्णा शाळीग्राम पराभूत वि. मयुरी ठोंबरे ३-११, २-११. अर्चिता अंजन विवि बिल्वा गाडगीळ ११-०, ११-२. अंकिता मुंडे विवि मैथिली गोगटे ११-८, ११-९. अचिता अंजन पराभूत वि. मयरी ठोंबरे २-११, ७-११. अपर्णा शाळीग्राम विवि बिल्वा गाडगीळ ११-१, ११-२). संस्कृती विद्यालय विवि महेश विद्यालय : ३-० रिद्धी गणपुले विवि गौरी चकणे ११-६, ११-६. सृष्टी शिंदे विवि प्रांजली धूत ११-९, ११-६. अनया टिकू विवि वेदिका येनपुरे ११-५, ११-५).अंतिम फेरी : डीएव्ही विवि संस्कृती विद्यालय : ३-१ (अपर्णा शाळीग्राम विवि सृष्टी शिंदे ११-३, ११-६. अर्चिता अंजन पराभूत वि. रिद्धी गणपुले ८-११,८-११. अंकिता मुंडे विवि अनन्या टिकू ११-३, ११-५. अर्चिता अंजन विवि सृष्टी शिंदे ११-९, ११-६).तिसºया स्थानासाठी लढत : सेवासदन विवि महेश विद्यालय : ३-१ (बिल्वा गाडगीळ पराभूत वि. प्रांजली धूत ७-११, ११-९, ९-११. मयुरी ठोंबरे विवि गौरी चाहुरी ११-१, ११-२. मैथिली गोगटे विवि वेदिका येनपुरे ११-१, ११-३. मयुरी ठोंबरे विवि प्रांजली धूत ११-१, ११-१).
टेबल टेनिस : डीएव्ही संघाला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 2:28 AM