वाल्हे (ता.पुरंदर) परिसरामध्ये चिंचेच्या झाडांना आलेली फुले पाहून झाडाची किंमत आगोदर ठरविली जाते. चिंच खरेदी करणाऱ्यांत लहान व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. दोन-चार झाडे घेणारे व्यापारी चिंचा फोडून गावातील मोठ्या व्यापाऱ्यांना विकतात. मोठे व्यापारी सुपा (ता. बारामती) किंवा अहमदनगर येथे फोडलेल्या चिंचा व चिंचोके विकतात. झाडाचा विस्तार, लागलेली फळे-फुले, बहराचे प्रमाण पाहून व्यापारी दर ठरवतात. उत्पादनाचे चांगले वर्षे असेल तर चांगल्या झाडाला साधारणतः चार हजार रुपयांचा दर ठरतो. ॉ
चार महिने रोजगार
चिंचा झोडण्याचे काम फेब्रुवारीमध्ये सुरू होते. ते मे महिन्यापर्यंत संपते. या चार महिन्यांत ग्रामीण भागात मोठी रोजगार निर्मिती होते. शेतीच्या कामांनाही मजुरांची टंचाई भासते. झाडावर चढून बांबूने झोडपून चिंचा खाली पाडणे, जमिनीवर पडलेल्या चिंचा वेचणे, त्यांच्यावरील टरफल बाजूला करणे, चिंचा फोडून गर व चिंचोके वेगळे करणे यासाठी मजूर मोठ्या प्रमाणात लागतात. चिंचा झोडपण्यासाठीच जास्त प्रमाणात मजूर लागतात. त्यांना प्रति दिन ५०० रुपये मिळतात. चिंचा वेचणाऱ्या महिलांना २०० रुपये प्रति दिन मजुरी मिळते. टरफल बाजूला केल्यानंतर चिंचा फोडतात. चिंचेपासून साधारणतः ५५ टक्के गर, १४ टक्के चिंचोके व ११ टक्के टरफल व शिरांचे उत्पादन मिळते.
--
चौकट
सध्या बाजारपेठा उघड्या असल्याने लवकरात लवकर चिंचेची फोडणी करून बाजारपेठेत विक्री व्हावी व गुंतवलेला पैसा मोकळा व्हावा यासाठी चिंचेच्या व्यापारी महिला मजुरांना जास्तीचे पैसे मोजून फोडणी करुन घेत आहेत. त्यामुळे वाल्हे परिसरातील ग्रामीण भागातील महिला मजुरांच्या हाताला काम मिळत असून, त्यांना पाच किलो चिंच फोडणीसाठी ४० रुपये मिळत आहे. एक महिला दिवसातून २५ ते ४० किलो चिंच फोडणी करते. त्यामुळे त्यांना दोनशे ते तीनशे रुपये पर्यंत रोजंदारी पडते. सध्या खरीप व रब्बी हंगामातील शेतीकामे अटोपल्याने चिंच फोडणीच्या कामाने महिलांच्या हाताला काम मिळून, चार पैशाचा आधार मिळत आहे.
--
चिंच झोडपण्याचा सिजन यंदा अजून महिना ते दिड महिन्यांपर्यंत सुरू राहील. मात्र मागील काही दिवसांपासून चिंचेचे बाजारभाव कमी झाल्याने, शेतकरीवर्गाला चिंचेला आलेली फुले पाहून दिलेले पैसे सुद्धा आम्हाला मिळणे कठीण होऊ लागले आहे. असाच बाजारभाव राहिला तर, मजुरांना मजुरी देणेही शक्य होणार नाही.
- सुरेश गोंजारी, चिंच व्यापारी
---
वाल्हे :
फोटो क्रमांक :
फोटोओळ - वाल्हे (ता.पुरंदर) परिसरात सुरू असलेली चिंचेची झोडणी.