शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

तलाव भरण्यासाठी ‘टेल टू हेड’, पालकमंत्र्यांच्या सूचना, पाणीवापराबाबत नियोजन, यंदा ५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 2:53 AM

खडकवासला प्रकल्पांतर्गत २०१७-१८च्या खरीप हंगामातील पाणी नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यातील एकूण ५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राचे पाणी नियोजन करण्यात आले आहे. या वेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सर्व तलाव भरून देण्याची मागणी केली, तर पालकमंत्री गिरीश बापट यांनी तलाव भरण्याच्या तसेच ‘टेल टू हेड’ पाणी देण्याबाबत अधिका-यांना सूचना केल्या.

बारामती : खडकवासला प्रकल्पांतर्गत २०१७-१८च्या खरीप हंगामातील पाणी नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यातील एकूण ५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राचे पाणी नियोजन करण्यात आले आहे. या वेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सर्व तलाव भरून देण्याची मागणी केली, तर पालकमंत्री गिरीश बापट यांनी तलाव भरण्याच्या तसेच ‘टेल टू हेड’ पाणी देण्याबाबत अधिका-यांना सूचना केल्या.खडकवासला प्रकल्पांतर्गत खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर या चारही धरणांतील पाणी खडकवासलाच्या नवीन मुठा कालव्यामार्फत हवेली, दौंड, इंदापूर व बारामती या चार तालुक्यांतील ५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राला यंदा पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या कालव्यामधून वरवंड व शिर्सुफळ तलावात पाणी सोडून त्याद्वारे जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनांद्वारे १३ हजार ८३५ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाची तरतूद प्रकल्प अहवालामध्ये आहे. यामध्ये सणसर जोड कालव्यावरील ११ हजार ३८८ हेक्टर क्षेत्र मात्र या नियोजनात समावेश करण्यात आलेला नाही. हवेली तालुक्यातील ५ हजार ७८५ हेक्टर, दौंड तालुक्यातील २८ हजार ५५ हेक्टर क्षेत्र, बारामती तालुक्यातील ९८० हेक्टर क्षेत्र व इंदापूर तालुक्यातील १५ हजार ९३८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या शिवाय पुणे शहर, दौंड, इंदापूर नगरपालिका व २२ ग्रामपंचायती, ९२ संस्थांना पिण्यासाठी व ३१ संस्थांना औद्योगिक वापरासाठी पाणी दिले जाते.यंदाच्या वर्षी पुणे महानगरपालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी ५ टीएमसी पाणी एका वर्षामध्ये वापरास शासनाची मान्यता आहे, तर अतिरिक्त लोकसंख्येला ६.५ टीएमसी असा एकूण ११.५० टीएमसी पाणी वापरास मंजुरी आहे. सध्या पुणे महानगरपालिकेकडून १ हजार ३५० एमएलडी पाणी दररोज वापरण्यात येत आहे. त्यानुसार ९३ दिवसांसाठी ४.३७ टीएमसी पाणी खडकवासलामधून पुणे महानगरपालिका वापरणार आहे. परिणामी, शासन मान्यतेपेक्षा १.४२ टीएमसी पाणी पुणे महानगरपालिका जास्ता वापरणार आहे. धरणामध्ये ६६ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून २२ जुलै २०१७ ला आवर्तन सुरू करण्यात आले होते.खरीप हंगामासाठी ५.४६ टीएमसी, बिगर सिंचनासाठी ०.१४ टीएमसी, तर वरवंड व शिर्सुफळ तलाव भरण्यासाठी ०.२८ टीएमसी पाणी सोडण्याचा प्रस्ताव होता. यापैकी धरणातून २२ जुलै ते १० सप्टेंबर दरम्यान ६.०५ टीएमसी पाणीवापर झाला आहे.खरीप हंगामातील पहिले आवर्तन संपल्यानंतर, सांडव्यावरून पाणी वाहत असल्यास खरिपाचे दुसरे आवर्तन सलगपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र, जर पावसाचा जोर कमी झाला व सांडव्यावरून पाणी वाहने बंद झाले तर सिंचनाच्या गरजेनुसारच धरण १०० टक्के भरल्यानंतर, दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार अजित पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, आमदार दत्तात्रय भरणे, जयदेव गायकवाड, राहुल कुल, बाबूराव पाचर्णे, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, खडकवासला विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.रब्बी व खरीप हंगामातील सिंचनावर ताणखडकवासला प्रकल्पातून पुणे महानगरपालिका पिण्याच्या पाण्यासाठी वार्षिक १६.५० टीएमसी इतके पाणी वापरते. पुणे महानगरपालिका मंजुरीपेक्षा ५ टीएमसी पाणी जास्त वापरत आहे. त्यामुळे रब्बी व खरीप हंगामातील सिंचनावर ताण येत आहे. यंदाच्या वर्षी टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.शासनाच्या तज्ज्ञ समितीने ६९५ मीटरपर्यंतच पाणीपातळी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यंदा टेमघरमध्ये १.७५ टीएमसी पाणीसाठा कमी असणारआहे. त्यामुळे काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.५० हजार ७५८ हेक्टर क्षेत्राला यंदा पाणी देण्याचे उद्दिष्ट.जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनांद्वारे १३ हजार ८३५ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाची तरतूद.पुणे महानगरपालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी ५ टीएमसी पाणी एका वर्षामध्ये वापरास शासनाची मान्यता.सध्या पुणे महानगरपालिकेकडून १ हजार ३५० एमएलडी पाणी दररोज वापरण्यात येत आहे.