महिला सक्षम होण्यासाठी टेलरिंग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला. १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून व रूपश्री महिला विकास संस्थेच्यावतीने हेे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदस्या वैशाली देवकर, वैशाली शिंदे, श्रद्धाताई गडगे यांनी वेळोवेळी याकरिता पाठपुरावा केला.
वडगाव आनंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या टेलरिंग प्रशिक्षणाचे उद्घाटन सामाजिक कार्यकत्या लता वाव्हळ यांनी केले. सरपंच शशिकांत लाड, उपसरपंच संतोष चौगुले, सामाजिक कार्यकर्ते व सदस्य डी. बी. वाळुंज, सहाय्यक अभियंता राजापूरकर, उद्योजक तुषार वामन, समीर देवकर, सदस्या वैशाली देवकर, वैशाली शिंदे, श्रद्धा गडगे सोमनाथ गडगे व महिला उपस्थित होत्या.
प्रास्ताविक वैशाली देवकर यांनी केले तर, महिलांनी टेलरिंग प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहून स्वयंभू व्हावे, असे आपल्या भाषणात डी. बी. वाळुंज यांनी बोलताना सांगितले. पंचायत समितीचे सहाय्यक अभियंता राजापूरकर यांनी प्रशिक्षण घेताना लहान व वयस्कर मुलांसाठी मास्क बनवून वाटप करण्याचे आवाहन या वेेेळी केले.
२८ आळेफाटा
टेलरिंग प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर.
280821\img-20210827-wa0220.jpg
वडगाव आनंद येथे महिलांसाठी टेलरींग प्रशिक्षण कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी व मान्यवर