शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

सरकारी जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा पालक सचिवांवर हक्कभंगाची कारवाई करा; मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 8:07 PM

मंत्रालय स्तरावरील बाबूगिरी करणाऱ्यांवर हक्कभंग कारवाई करा, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी 

ठळक मुद्देराज्यातील जिल्हा पालक सचिवांनी केली लोकशाहीची चेष्टा

बारामती : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी पालक सचिवांची सन २००० पासून नियुक्ती करण्यात आली आहे. नागरीक आणि प्रशासनातील समन्वयासाठी निर्माण केलेल्या पदांना संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ शोभेचेच बाहुले बनवले आहे. शासन निर्णयाचे पालन करण्यास उदासीन असणाऱ्या जिल्हा पालक सचिव या नियुक्त्याच कायमस्वरूपी बंद कराव्यात. शासकीय जबाबदारी पार पाडण्यासाठी सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या सर्व जबाबदार जिल्हा पालक सचिवांवर शिस्तभंग व हक्कभंगाची कारवाई करावी,अशी मागणी राज्य ग्राहक संरक्षण परिषद सदस्य अ‍ॅड. तुषार झेंडे यांनी केली आहे.

याबाबत अ‍ॅड. तुषार झेंडे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह राज्यपालांकडे मागणी केली आहे.त्यानुसार मुख्यमंत्रीनी दिलेल्या आदेशानंतर झालेल्या  शासन निर्णयानुसार जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून नियुक्त्या  करण्यात आल्या आहेत. शासन स्तरावर (मंत्रालय) प्रलंबित बाबींची तातडीने सोडवणूक करणे, तसेच शासनाचे धोरणात्मक निर्णय, प्रशासकीय सुधारणा आणि विविध लोकोपयोगी व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी पालक सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. जुलै २०१७ ते आज अखेर एकाही जिल्हा पालक सचिव यांनी पालन केले नाही. पालक सचिवांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात वषार्तून चार दौरे करणे आवश्यक असताना एकही दौरा तसेच आपत्कालीन परिस्थितीज एकाही पालक सचिवांनी दौरा केला नाही. जिल्हा पालक सचिवांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभागच्या क्षेत्रीय कार्यालयाचे व त्याव्यतिरिक्त अन्य एका विभागाच्या कार्यालयाचे एकही निरीक्षण केले नसल्याचे उघड झाली आहे. त्यामुळे मंत्रालय स्तरावर अधिकाऱ्यांची बाबुगिरी उघड झाली आहे. पालक सचिवांनी एक ग्रामसेवक, तलाठी भूमीअभिलेख कार्यालयाचे एकाही सचिवाने निरीक्षण करून अहवाल दिला नाही. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे प्रलंबित राहिल्याची माहिती झेंडे यांनी दिली.

वास्तविक लोकशाही दिनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पालक सचिव संकल्पना अस्तित्वात येवून नेमणूका करण्यात आल्या, परंतु सदर अधिकारी याचे पालन करण्याचे टाळून एकप्रकारे लोकशाहीची चेष्टा करीत आहेत. जिल्हापालक सचिव शासन निर्णयाचे पालन करीत नसतील तर लोकप्रतिनिधींचा म्हणजेच लोकशाहीचा अपमान आहे.त्यामुळे या सर्व जिल्हा पालक सचिवांच्या या कृत्याबाबत सभागृह समितीमार्फत अहवाल मागववा.तसेच त्यांच्यावर  हक्क भंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची मागणी झेंडे यांनी केली आहे.—————————————————...पालक सचिवांकडुन लोकशाहीची पायमल्लीजिल्हा पालक सचिवांनी शासन निर्णयाचे पालन करणे आवश्यक होते.त्यांनी पालन केले असते तर, एका वर्षात राज्यातील १४४ ग्रामसेवक, १४४ तलाठी, १४४ भूमीअभिलेख कार्यालये व सचिवांच्या विभागाचे कार्यालये १४४ आणि इतर एका विभागाचे १४४ असे एकूण ७२० कार्यालयाचे निरीक्षण मंत्रालयीन सचिव यांचेकडून झाले असते. याचा धसका इतर कार्यालयात १०० पटीने झाला असता. ७२० कार्यालयांचे निरीक्षण म्हणजे राज्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत मंत्रालयीन सचिव पोहोचले असते.परंतु एकाही जिल्हा पालक सचिवांनी याचे पालन केले नाही, अहवाल दिला नाही. लोकशाहीची पायमल्ली केल्याची तक्रार अ‍ॅड. झेंडे यांनी केली आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकार