कामात 'झोल' करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करा: शिवसेना व काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 08:00 PM2021-04-09T20:00:40+5:302021-04-09T20:01:38+5:30

महापालिका आयुक्तांनी बजावल्या होत्या कारणे दाखवा नोटिसा...

Take action against engineers who are 'fraud' in work ; Shiv Sena and Congress demand | कामात 'झोल' करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करा: शिवसेना व काँग्रेसची मागणी

कामात 'झोल' करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करा: शिवसेना व काँग्रेसची मागणी

Next

पुणे : आर्थिक संकटाचा सामना मारीत असलेल्या महापालिकेच्या कोट्यवधींच्या निधीमध्ये डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू असून 'मार्च एंड'च्या विकासकामांच्या आडून भ्रष्टाचार पोसला जात आहे. पालिका आयुक्तांनी १९ अभियंत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणांची सनदी लेखापालांमार्फत चौकशी करून दोषी अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे.

'मार्च एंड' च्या कामांमध्ये क्षेत्रीय कार्यालय स्तरावर करण्यात आलेली कामे निकृष्ठ दर्जाची असून अनेक कामे अशास्त्रीय पद्धतीने करण्यात आली आहेत. अनेक कामे अर्धवट असताना बिले काढण्यात आली आहेत. पालिका आयुक्तांनी या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी दक्षता पथक नेमले आहे. या पथकाने २३ कामाची प्रत्यक्ष पाहणी करीत त्याचा सविस्तर अहवाल आयुक्तांना सादर केला. यामध्ये सर्वाधिक दोष 'थर्ड पार्टी ऑडिट'ला देण्यात आलेला आहे. अहवालाच्या आधारे आयुक्तांनी एक परिमंडळ उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त, तीन कार्यकारी अभियंता यांच्यासह ११ कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

यासंदर्भात शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. आयुक्तांच्या कार्यपद्धतीचे समर्थन करतानाच दर्जाहीन कामे करणारे, कामे न करताच बिले काढणारे तसेच चुकीचे मोजमाप करून कोट्यवधी रुपयांचा अपहार करणार्‍यांना पाठीशी घालू नये. मागील चार वर्षांत केलेल्या कामांची तपासणी करुन सर्व भ्रष्टाचार खणून काढावा. या कामांचे ऑडीट करण्यासाठी नियुक्त केलेल्या थर्ड पार्टी एजन्सींचीही चौकशी करावी. या प्रकरणात दोषी आढळणार्‍यांची सनदी लेखापालांमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी  करण्यात आली आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, श्याम देशपांडे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी हे निवेदन दिले.
  ------- 
प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनीही आयुक्तांना निवेदन दिले आहे. पालिकेच्या निविदेप्रमाणे काम न करताच मोठ्या प्रमाणावर बिले अदा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कामाची पाहणी न करताच थर्डपार्टी इन्स्पेक्शन करणार्‍या संस्था तसेच अधिकारी फाईलवर सह्या करतात. ठेकेदारांसोबतच अधिकारीही दोषी आहेत. कामे न करताच बिले घेणार्‍या ठेकेदारांचीही चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Take action against engineers who are 'fraud' in work ; Shiv Sena and Congress demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.