शहरात शुक्रवारी झालेल्या अपघातानंतर आमदार अशोक पवार यांनी शनिवारी नगरपालिका व पोलिस प्रशासनाची तातडीची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी लिगलचे प्रदेश सरचिटणीस अँड . शिरीष लोळगे, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार, तालुका राष्ट्रवादीचे दिनकर पाडळे, राम लिंग देवस्थान चे विश्वस्त पोपटराव दसगुडे, वाल्मीकराव कुरंदळे, सराफ असोसिएशनचे राजेंद्र लोळगे, शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, बिरदेव काबुगडे,शिरुर नगर परिषद स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे,शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, युवक अध्यक्ष रंजन झांबरे,सागर नरवडे, हाफिज बागवान, राहील शेख उपस्थित होते.
आमदार पवार म्हणाले, शिरूर शहरांतर्गत नगर -पुणे रस्त्यावर एसटी स्टँड ते विद्याधाम प्रशालापर्यंत बेशिस्त वाहन चालक, हातगाडी, यांच्यावर कडक कारवाई करावी, यासाठी शिरूर नगरपरिषद व पोलिसांनी संयुक्तपने पथक स्थापन करावे. कारवाई करताना कोणीही असाला किंबहूना आमदाराचा भाऊ जरी असला तरी त्यांच्यावर कारवाई करावी. शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावर पोलिसांनी जड वाहनांना या रस्त्यावर वाहतूक करण्यास प्रतिबंध करावा. नगरपालिका अधिकारी व पोलिस अधिकारी यांना वाहतुकीचे योग्य प्रकारे नियोजन करावे. भविष्यात अशा प्रकारचे अपघात होऊ नये,म्हणुन योग्य ते नियोजन व खबरदारी घ्यावी अशा सुचना आमदार अशोक पवार यांनी दिल्या.