ऑगस्ट महिन्याचा पहिला शनिवार गिधाड दिन म्हणून साजरा होतो. भारतात जिप्सी गिधाड, लांब चोचीचे गिधाड, पांढऱ्या पाठीचे, राज गिधाड दिसून येतात. सध्या कीटकनाशकांचा खूप वापर होत आहे. त्यामुळे अन्नसाखळी नष्ट होत आहे. छोटे कीटक मरतात, कीटकांना खाऊन मुंगूस, कोल्हे, जंगली मांजर, तरस मरतात. त्यामुळे गिधाडंही विषारी अन्न खाऊन मरतात, असे डॉ. पांडे म्हणाले.
‘‘आम्ही काही वर्षांपूर्वी गिधाडांचे संशोधन करण्यासाठी वीण करतात तिथं ट्रॅप कॅमेरे लावले आणि निरीक्षण केलं. त्यावरून जाणवलं की, त्यांना खायला मिळत नाही. म्हणून त्यावर नंतर व्हल्चर रेस्टाॅरंट हा उपक्रम सुरू केला. तसेच विंग टॅगिंग, रिंग लावणे असे प्रयोग केले. त्यातून शास्त्रीय अभ्यास झाला. कड्यावर हे गिधाड वीण करताना चार महिने राहतात. कधी कधी तिथं उन्हाळ्यात ४५ डिग्री सेल्सिअस तापमान होतं. ते सहन करत ते जगतात.’’
———————————————
खरं तर गिधाड हे स्वच्छतादूत आहेत. ते सडलेले मांस खातात. पूर्वी गावात जनावरं मेलं की, गावाबाहेर ढोरफोडीच्या जागी टाकत. तिथं मग गिधाड येऊन ते खात असत. पण आता त्या जागाच संपल्या आहेत. सर्वत्र लोकांनी घरं बांधली आहेत. गिधाडांची जागा मात्र गेल्या आहेत.
- डॉ. सतीश पांडे, पक्षितज्ज्ञ
————————————-----
त्यांचे अधिवास जपणे आवश्यक
जर परत गिधाडांची संख्या वाढवायची असेल तर त्यांचे अधिवास जपले पाहिजेत. कारण त्यांचे अधिवास त्यांच्या जिन्समध्ये असतात. ते तिथे नक्की येतील. जुन्या जागा संरक्षित करायल्या हव्यात. लोकांचा सहभाग हवा. कीटकनाशकांचा वापर कमी करायला हवा. तरच त्यांची संख्या परत चांगली होईल आणि अन्नसाखळी देखील पूर्ववत होईल, असे डॉ. पांडे म्हणाले.
—————————————-