पुणे : पीएमपीच्य बसेस सातत्याने रस्त्यावर बंद पडत असल्याने वाहतूक काेंडी हाेत असते. त्यातच बस बंद पडत असल्याने प्रवाशांचाही खाेळंबा हाेत असताे. बस मार्गात बंद पडल्यानंतर तासन तास एकाच जागी अनेकदा उभी असलेली पाहायला मिळते. दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक त्यातच रस्त्यात बंद पडणाऱ्या पीएमपी बसेस यामुळे शहरातील विविध रस्त्यांवर हाेणारी वाहतूक काेंडी नित्याचीच झाली अाहे. त्यामुळे यावर अाता पाेलिसांच्या वाहतूक शाखेने पीएमपीचे कान टाेचले असून रस्त्यावर पीएमपी बसेस बंद पडणार नाहीत याची काळजी घेण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे. त्यामुळे अाता तरी पीएमपी प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.
पीएमपीच्या बसेस रस्त्यात बंद पडणे नित्याचेच झाले अाहे. 10 लाखांहून अधिक प्रवासी संख्या असतानाही पीएमपी प्रशासन प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यात कमी पडत अाहे. तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात त्यांनी बसेसचे ब्रेक डाऊनचे प्रमाण कमी केले हाेते. परंतु त्यांच्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थेच अाहे. अाता तर थेट वाहतूक शाखेनेच पीएमपी प्रशासनाला पत्र लिहिले अाहे. मार्गावर बंद पडणाऱ्या बसेसमुळे वाहतूक काेंडी हाेत असून मार्गावर बसेस वारंवार बंद पडणार नाहीत, याची काळजी घेण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे. त्याचबराेबर साेबत जानेवारी पासून जुलै पर्यंत मार्गात बंद पडलेल्या बसेसची यादी सुद्धा जाेडण्यात अाली अाहे.
जानेवारी 2018 ते 20 जुलै 2018 पर्यंत एकूण 1942 बसेस रस्त्यावर बंद पडल्या अाहेत. त्यांच्यामुळे पुणेकरांना वाहतूक काेंडीचा मनस्ताप सहन करावा लागला अाहे. त्यामुळे अाता वाहतूक शाखेने सुद्धा कान टाेचल्यानंतर पीएमपीच्या बसेस मार्गावर बंद पडण्याचे प्रमाण कमी हाेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार अाहे.