शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

ठिबकद्वारे घ्या भातपीक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:48 PM

गुंजवणी धरणाच्या पाणीवाटपाबाबत सुधारित अहवाल समितीने नुकतात राज्य सरकारकडे सादर केला

लोकमत न्यूज नेटवर्कमार्गासनी : गुंजवणी धरणाच्या पाणीवाटपाबाबत सुधारित अहवाल समितीने नुकतात राज्य सरकारकडे सादर केला असून, यात भोर, वेल्हा तालुक्यांतील शेतक-यांची चेष्टा केली आहे. येथील मुख्य पीक भात असून त्यास सिंचनाद्वारे पाणी देण्यास सुचविले आहे. भातपिकास सिंचनाद्वारे पाणी दिल्यास भातपिकेच राहणार नाहीत.यासह अनेक बाबतीत येथील शेतक-यांचा विचारच केला नसल्याने आमदार संग्राम थोपटे यांनी याला आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी मुख्यामंत्र्यांसह संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणाचे पाणीवाटपाबाबत राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा धरणग्रस्त यांचा समावेश न करता अहवाल तयार करण्यात आला. हा सुधारित अहवाल समितीने राज्य सरकारकडे सादर केला आहे. मात्र यात विसंगती असून प्रकल्पग्रस्त व लाभार्थी यांच्यावर अन्याय होत असल्याचे थोपटे यांचे म्हणणे आहे.पत्रकार परिषदेस जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, उपसभापती दिनकर सरपाले, काँग्रेसचे भोर तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे, विष्णू राऊत, माजी सभापती रघुनाथ कथुरे, माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर, माजी उपसभापती डॉ. संभाजी मांगडे, दिलीप बाठे, दत्तात्रय दिघे, प्रकाश जेधे, राजाराम देवगिरीकर, बळीबा आधवडे, प्रभाकर आधवडे, शंकर जेधे आदींसह गुंजवणी प्रकल्पग्रस्त व शेतकरी उपस्थित होते.याबाबत तालुक्यातील शेतकºयांना विचारात घेतले नाही. तर मूळ अहवालात एकही उपसा सिंचन योजना प्रस्तावित नव्हती तर नवीन अहवालात नारायणपूर उपसा सिंचन योजना (दीडशे कोटी) प्रस्तावित आहे. भोर व वेल्हे तालुक्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यासाठी काय तरदूत केली आहे हे समजून येत नाही. वेल्हे तालुक्यातील उपसा सिंचनासाठी वांगणी, वाजेघर, रांजणे, खामगाव तर २० किलोमीटर उजवा कालवा, डावा कालवा याबाबत काहीही उल्लेख नाही. मूळ अहवालात पाण्याचे क्षेत्र भोरसाठी ७२८५ व वेल्ह्यासाठी ६८५ इतके होते, तर नवीन अहवालात भोरसाठी ९४३५ आणि वेल्ह्यासाठी ८५० क्षेत्र वाढविले आहे. क्षेत्र वाढूनही गावांची संख्या वाढली नाही.राजगड सहकारी साखर कारखाना निगडे येथे गुंजवणी पाणीवाटपाच्या सुधारित अहवालाबाबत माहिती देताना आमदार संग्राम थोपट व काँग्रेसचे पदाधिकारी.विद्युतनिर्मिती होणार नाही?मूळ प्रकल्प अहवालात धरणाजवळ २ मेगावॅट इतकी विद्युतनिर्मिती प्रस्तावित होती, परंतु नवीन अहवालात शासनाने तत्त्वत: मान्यता देताना धरणाजवळ विद्युत गृह उभारून त्यानंतर बंद पाईपलाईन करण्याचे नियोजित होते. त्यास दि. २१ एप्रिल २०१७ रोजी शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे.प्रस्तावित नवीन अहवाल तयार करताना विद्युत गृहाचा कोठेही विचार केल्याचे दिसत नाही. त्यामुळे २ मेगावॅट विद्युतनिर्मिती होणार नाही. त्यामुळे शासनाचे दरवर्षी ३.२८ कोटी इतके उत्पन्न बंद होणार आहे.>भोर, वेल्हे तालुक्यात मूळ अहवालात भोर तालुक्यात २८ टक्के व वेल्हे ४० टक्के भातक्षेत्र होते. परंतु नवीन अहवालानुसार कमी करुन भोर व वेल्ह्यासाठी प्रत्येकी २५ टक्केच पाण्याचे क्षेत्र सुचविले आहेत. ठिबक सिंचनाद्वारे भातपिके घेणे म्हणजे शेतक-यांची चेष्टा केल्यासारखे दिसत आहे. गहू, हरभरा व ज्वारी पिके न घेण्याचे सुचविले आहे. म्हणजे येथील शेतकºयांनी केवळ भातपिकेच घ्यावीत व इतर कोणतीही पिके घेऊ नयेत असे अहवालात नमूद केले आहे.>देखभाल शेतक-यांना करावी लागणारपाटाद्वारे पाणी देण्याची तरतूद होती परंतु आता वितरण व्यवस्था बंद पाईपद्वारे व ठिबक सिंचनाद्वारे प्रस्तावित केली आहे. यामुळे शेतकºयांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे याची देखभाल दुरुस्ती शेतक-यांना करावी लागणार आहे.