लोकमत न्यूज नेटवर्क
लोणीकंद : ‘‘देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व प्रकाशक आनंद हर्डीकर यांनी केले.
फुलगाव (ता. हवेली) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून हर्डीकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक अभय छाजेड होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध विद्यार्थ्यांनी यावेळी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनचरित्रातील प्रसंगाचे सादरीकरण केले. कार्यक्रमास
यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक पायगुडे, जनक टेकाळे, प्राचार्या ज्योती अरडे, सुहास निकम, प्राचार्य नरहरी पाटील, प्रा. ज्ञानेश्वर कुंदे, शशिकांत थोरात आदी उपस्थित होते. पांडुरंग जगताप, ज्ञानेश्वर अवचार यांनी प्रास्तविक व स्वागत केले. आभार प्रदर्शन सोनल बोकील यांनी केले.