राहूबेट परिसरात मुळा-मुठा, भीमा नदीकाठच्या वनविभागाच्या घनदाट जंगल परिसरात बिबट्याला लपण्यासाठी भरपूर जागा आहे. तर परिसरात उसशेती मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्या मागमूसही हाती लागत नाही. परिसरात बिबट्या सातत्याने दिसत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. यासंदर्भात ग्रामस्थांनी वेळोवेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले असून, परंतु ट्रान्सपोर्ट तसेच वरिष्ठांचे आदेश नसून पिंजरा उपलब्ध होत नसल्याचे उत्तरे अधिकारी देत आहेत. यासंदर्भात त्वरित उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या वेळी माजी सरपंच गोविंद यादव, माजी उपसरपंच ज्योती झुरुंगे, मनोज हंबीर, संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.
०३ पाटेठाण
वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देताना ज्योती यादव व इतर.