पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह मुळशी, मावळ, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यांमध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत बंद करण्यात आलेले मीटर रिडींग व वीजबिल वितरणाचे काम स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळालेल्या भागात आणि कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून सुरु करण्यात आले आहे. तसेच २३ मार्चनंतर आता वीजग्राहकांकडील मीटर रिडींग घेतल्यानंतर प्रत्यक्ष वीजवापराच्या युनिटप्रमाणे दोन ते अडीच महिन्यांचे एकच अचूक वीजबिल दिले जात आहे. यामध्ये ग्राहकांनी एप्रिल, मे महिन्यात भरलेली रक्कम व सरासरी युनिट समायोजित केले जात आहे.कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणकडून मीटर रिडींग घेणे व छापील वीजबिल वितरीत करणे तात्पुरते बंद करण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्यासोबतच वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडींग घेणे व वीजबिल वितरीत करणे सुरु करण्यात आले आहे. पुणे शहरात १६ लाख ४७ हजार, पिंपरी चिंचवड शहरात ६ लाख ६७ हजार तर मुळशी, मावळ, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यांत ६ लाख ३८ हजार वीजग्राहक आहेत. स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागामध्ये आणि कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र (कन्टेंटमेंट एरिआ) वगळून वीजग्राहकांकडील मीटचे रिडींग घेतले जात आहे. एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांनी मीटर रिडींग घेताना हॅण्ड ग्लोव्हज, मास्क, सॅनिटाजर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सोसायट्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आवश्यक असल्यास परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.------------दोन-अडीच महिन्यांचे एकत्रित बिल आल्यास घाबरू नका लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग तात्पुरते बंद असल्याने ग्राहकांना सरासरी युनिटचे वीजबिल पाठविण्यात आले होते. तसेच वेबपोर्टल व मोबाईल अॅपद्वारे स्वत:हून मीटर रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. मात्र, एप्रिल, मे, जून महिन्यांत स्वत:हून रिडींग न पाठविणाऱ्या वीजग्राहकांना आता मीटर रिडींग घेतल्यानंतर अचूक व प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिल पाठविण्यात येत आहे.हे वीजबिल लॉकडाऊन कालावधीतील दोन-अडीच महिन्यांचे असले तरी संगणकीय प्रणालीद्वारे बिलाची मासिक वापरानुसार विभागणी करून युनिट व स्लॅबप्रमाणे वीजदर लावून (स्लॅब बेनिफिटसह) दिले जाणार आहे.
महावितरणकडून मीटर रिडींग घेणे आणि वीजबिल दुरूस्तीची प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 7:39 PM
दोन-अडीच महिन्यांचे एकत्रित बिल आल्यास घाबरू नका...
ठळक मुद्देमीटर रिडींग घेतल्यानंतर दोन ते अडीच महिन्यांचे एकच वीजबिलशासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे वीजबिल भरणा केंद्र सुरु