लोणावळा (पुणे) : लोणावळ््याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मृत्यूचा काळ, वेळ, ठिकाण आणि कारण निश्चित करून तसे मृत्यूयंत्र आणि काळ््या बाहुलीची बांधलेली तिरडी यांचा उतारा त्यांच्या घराच्या दरवाजापुढे रविवारी सकाळी आढळून आला आहे. अंधश्रद्धेचा कळस गाठणारी ही घटना शहरात चर्चेचा विषय ठरली असून, त्याचा निषेध करण्यात येत आहे. जाधव या शिवसेनेचे नगरसेवक शिवदास पिल्ले यांच्या मुलाच्या लग्नासाठी केरळला गेल्या आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत घरासमोर असा प्रकार घडला आहे.या उताऱ्यात एका कागदावर जाधव यांच्या नावाचा उल्लेख असणारे एक मृत्यूयंत्र रेखाटण्यात आले आहे. त्यावर जाधव यांच्या मृत्यूची दिनांक, वेळ, ठिकाण व मृत्यू कसा होणार याचा उल्लेख आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हे साहित्य हटविले.(प्रतिनिधी)
नगराध्यक्षांच्या घराबाहेर उतारा अन् मृत्यूची कुंडली
By admin | Published: April 17, 2017 2:55 AM