पिंपरी पेंढार (जि. पुणे) : प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेअंतर्गत येथील एका शेतकऱ्याच्या खात्यावर फक्त १५५ रुपये ४८ पैसे जमा झाले. मात्र, काही वेळात पुन्हा त्यांच्या खात्यातील पैसे पुन्हा परत घेण्यात आले.खामुंडी येथील माजी सैनिक आणि शेतकरी शिवाजी चौधरी यांच्या सोबत हा प्रकार घडला आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तसेच त्यांचा सन्मान करण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्या वतीने या वर्षीच्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना जाहीर करण्यात आली. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या वर्षीपासून ठरावीक रक्कम या योजनेद्वारे मिळणार होती. केंद्राची ही योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावचे शेतकरी तसेच माजी सैनिक शिवाजी चौधरी हे अल्पभूधारक असून ते सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत. दोन दिवसाआधी या योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यावर १५५ रुपये ४८ पैसे जमा झाले. त्यानंतर दोन दिवसांनी ते पैसे कपात करण्यात आले. तुम्ही या योजनेत बसत नाही, असा एसएमएस त्यांना आला आहे.
माजी सैनिकाच्या खात्यातून योजनेची रक्कम घेतली काढून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 5:13 AM