पुणे : सिग्नल मोडणे, नो एंट्रीतून गाडी काढणे, विनापरवाना वाहन चालविणे यासारखे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या मोठी असली, तरी वाहतुकीचा नियम मोडल्यानंतर पकडल्यास तत्काळ दंडाची पावती फाडण्याकडेच पुणेकरांचा सर्वाधिक कल आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडून न्यायालयाची पायरी चढणाऱ्यांची संख्या नाममात्रच आहे. न्यायालयासाठी लागणारा वेळ व श्रम खर्ची करण्यापेक्षा तत्काळ दंडाची रक्कम भरणे किंवा पोलिसांबरोबर ‘तडजोड’ करण्यातच पुणेकर धन्यता मानीत आहेत. बहुतेक वेळा जागीच विषय निकाली काढला जातो. त्यामुळे मोटार वाहतूक न्यायालयात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या खटल्यांचे प्रमाण नाहीच, अशी परिस्थिती आहे. (प्रतिनिधी)
दंड घ्या, पण न्यायालयाची पायरी नको..!
By admin | Published: November 18, 2014 3:28 AM