पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) दिलेल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीतील प्रवेश येत्या २१ जुलैपर्यंत पूर्ण करावेत,असे आदेश पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशासाठी राबविण्यात आलेली आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देश न्यायालयाने शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यानुसार आरटीईच्या पहिल्या प्रवेश फेरीतून लॉटरी पध्दतीने प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित शाळांमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा. प्रवेश न देणाऱ्या शाळांवर शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे,असे पालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, आरटीई अंतर्गत प्रवेश मिळूनही शाळा प्रवेश देत नसल्यास सर्व पालकांनी एकत्र यावे,असे आवाहन आम आदमी पार्टीने केले आहे. तसेच सोमवारपर्यंत मुलांना प्रवेश मिळवून न मिळाल्यास येत्या २१ जुलै रोजी शिक्षण संचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आपचे नेते मुकुंद किर्दक यांनी दिला.
आरटीई प्रवेश २१ जुलैपर्यंत घ्या
By admin | Published: July 18, 2015 4:20 AM