राज्यमंत्री दत्तात्रय भरणे : निमसाखरला आरोग्य शिबिरात ४३२ जणांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वालचंदनगर : आजची लहान मुले ही उद्याच्या बलशाही भारताचे नेतृत्व करणार आहेत. यामुळे मुलांना सुदृढ सक्षम आणि बळकट बनवण्यासाठी पौष्टिक आणि सकस आहाराची गरज आहे. भारत महासत्ता होण्याचे स्वप्न केवळ आजचे लहान मुलेच पूर्णत्वास नेऊ शकतात. यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही केवळ शासनाची नाही तर प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे, असे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले
निमसाखर (ता. इंदापूर) येथे खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ४३२ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. निमसाखरमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजी पानसरे यांनी नीलकंठेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरामध्ये रक्तातील साखर, रक्तदाब, नेत्रतपासणी करुन ईसीजी काढण्यात आला. शिबिरामध्ये ४३२ नागरिकांची तपासणी झाली. यातील ३१ नागरिकांना मोतिबिंदू असल्याने त्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे, निमसाखरचे सरपंच धैर्यशिल रणवरे, डॉ. ए.न. जी.रणवरे,भगवानराव रणसिंग, वीरसिंह रणसिंग, धनंजय रणवरे, शिवाजी पानसरे, नंदकुमार पानसरे, सुरेश लवटे उपस्थित होते. शिबिरामध्ये डॉ. योगेश पाटील, डॉ.केशव जायभाय, डॉ.गणेश पानसरे, डॉ. दिपा पानसरे, डॉ.मनिषा जायभाय यांनी रुग्णांची मोफत तपासणी केली. यावेळी निमसाखरमधील लहान मुलांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.
-----
फोटो ओळी:- निमसाखर येथे लहान मुलांना पोष्ठिक आहाराचे वाटप करताना राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व शिवाजी पानसरे.
२००७२०२१-बारामती-०२