अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी शंकर दिवेकर यांच्या संदर्भात निलंबनाचे आदेश तहसीलदार संजय पाटील यांना दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
पाटस येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल ढमाले यांनी तलाठी शंकर दिवेकर यांच्या विरोधात तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केली होती. पाटस येथील गट नंबर ३८७ /अ / १ मधील १७ वर्षांपासून इतर हक्कात असलेली नोंद सातबाराच्या कब्जेदार सदरी करतांना उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांचे आदेश नसतांना बोगस नोंद केल्याच्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. दरम्यान तलाठी शंकर दिवेकर यांच्या कामात अनेक बाबींमध्ये त्रुटी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. परिणामी तहसीलदार संजय पाटील यांनी तक्रारदार राहुल ढमाले यांच्या बाजूने निर्णय देऊन तलाठी शंकर दिवेकर यांच्या कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवला होता. मात्र, तलाठी शंकर दिवेकर यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे तक्रारदार राहुल ढमाले यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. परिणामी तलाठी शंकर दिवेकर यांना निलंबित करण्यात आले.