तळेगाव दाभाडे : तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीने नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी १५ उमेदवारांची पहिली यादी बुधवारी जाहीर केली. उच्चशिक्षित युवक आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात पक्षप्रतोद बापूसाहेब भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे या विद्यमान नगरसेवकांचा, तर राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रांतिक उपाध्यक्ष संतोष भेगडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती ब्रिजेंद्र किल्लावाला या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.तळेगाव शहर शिवसेनाप्रमुख सुनील मोरे यांच्या मातु:श्री कमल अर्जुनराव मोरे, मनसेच्या रस्ते विकास व व्यवस्थापन समितीचे जिल्हाध्यक्ष सचिन भांडवलकर यांची पत्नी रेणुका भांडवलकर व माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण बबनराव माने यांना समितीने संधी दिली आहे. समितीचे अध्यक्ष बबन भेगडे आणि प्रचारप्रमुख बापूसाहेब भेगडे यांनी पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे पत्रकार परिषदेत जाहीर केली. गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले. अधिकृत १५ उमेदवार गुरुवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी समितीचे पदाधिकारी कृष्णा कारके, जयसिंग भालेराव, बाळासाहेब शिंदे, सुरेश चौधरी, नंदकुमार कोतूळकर, राम गवारे, दीलीप खळदे, दिलीप राजगुरव आदी उपस्थित होते. समितीचे उमेदवार : प्रभाग क्र. २ : (अ) नागरिकांचा मागासवर्ग- सुरेश धोंडिबा धोत्रे, (ब) सर्वसाधारण महिला- रेणुका सचिन भांडवलकर, प्रभाग क्र. ५ : (अ) सर्वसाधारण महिला- कमल अर्जुनराव मोरे, (ब) नागरिकांचा मागासवर्ग- मयुर दिलीप राजगुरव, प्रभाग क्र. ८ : (अ) सर्वसाधारण- ब्रिजेंद्र विजयकुमार किल्लावाला, (ब) नागरिकांचा मागासवर्ग महिला- ज्योती गिरीश चौरे, प्रभाग क्र.९ : (अ) सर्वसाधारण महिला- वैशाली प्रमोद दाभाडे, (ब) अनुसूचित जाती- अरुण बबनराव माने, प्रभाग क्र.१० : (अ) सर्वसाधारण- किशोर छबूराव भेगडे, (ब) नागरिकांचा मागासवर्ग महिला- सविता धनंजय मालवीय, प्रभाग क्र.११ : (अ) सर्वसाधारण- संतोष छबूराव भेगडे, प्रभाग क्र.१२ : (अ) सर्वसाधारण- रोहित ऊर्फ सोमा अनील भेगडे, (ब) सर्वसाधारण महिला- ताराबाई गुलाबराव भेगडे, प्रभाग क्र.१३ : (अ) सर्वसाधारण- बापूसाहेब जयवंतराव भेगडे, (ब) सर्वसाधारण महिला- मंगल नंदकुमार भेगडे. (वार्ताहर)
तळेगाव दाभाडे : शहर सुधारणा व विकास समितीची पहिली यादी जाहीर
By admin | Published: November 17, 2016 3:16 AM