तळेगाव दाभाडे : सराफांनी पुकारलेला संप मंगळवारी सायंकाळी मागे घेतल्याची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे परिसरात सोने-चांदी दागिन्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी सराफी पेढ्यांत गर्दी केली होती. गेल्या दीड महिनाभर सराफांनी बंद पुकारला होता. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांची गैरसोय झाली होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तालाही पेढ्या बंद होत्या. सोने खरेदीचा अक्षयतृतीयेचा मुहूर्त सापडणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, सराफांनी आज संप मागे घेतला, अशी माहिती अमेय मालपाठक यांनी लोकमतला दिली. मालपाठक म्हणाले, ‘‘येत्या गुरुवारी गुरुपुष्यामृताचा मुहूर्त आहे. खरेदीसाठी महिलांनी मंगळवारी गर्दी केली.’’(वार्ताहर) देशात १९६७, २०१४ मध्ये सराफांनी बंद पुकारला होता. मात्र, २०१६ मधील संप सर्वांत जास्त दिवसांचा झाला. अब्जावधी रुपयांची उलाढाल या दिवसात ठप्प पडली होती. मध्यम सराफांना त्याचा मोठा फटका बसला.- नितीश मालपाठक, उपाध्यक्ष, तळेगाव सुवर्णकार सराफ असोसिएशन
तळेगावमध्ये सराफांचा संप मागे
By admin | Published: April 13, 2016 3:28 AM