शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
3
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
4
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
5
"जिवंत राहिले तर आवश्य कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
6
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
7
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
8
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
9
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
10
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
11
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
12
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
13
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
14
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
15
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
16
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
17
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
18
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
19
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
20
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही

तळमाचीवाडी पुनर्वसन योजना आजही अर्धवट

By admin | Published: July 05, 2017 2:34 AM

डोंगरउतारावरील माती पावसाच्या पाण्याने वाहून येऊन झालेल्या माळीणसारख्या दुर्घटनेच्या सावटातच जुन्नर तालुक्यातील आदिवासी

नितीन ससाणे/ लोकमत न्यूज नेटवर्कजुन्नर : डोंगरउतारावरील माती पावसाच्या पाण्याने वाहून येऊन झालेल्या माळीणसारख्या दुर्घटनेच्या सावटातच जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील तळमाचीवाडी गावातील ग्रामस्थ सन २००५ पासून जीव मुठीत धरून राहात आहेत. गावाला तसेच ग्रामस्थांच्या जिवाला धोका असल्याने राज्य शासनाने या गावासाठी पुनर्वसन योजना राबविली परंतु अद्यापही निकृष्ट दर्जाचे बांधकाम, शासनाचे दुर्लक्ष यामुळे पुनर्वसनाचे काम अर्धवट आहे. ग्रामस्थ घाबरूनच येथे राहात आहेत.४जुन्नरपासून २५ किमी अंतरावरील निमगिरी गावालगतच्या डोंगरावर तळमाचीवाडी हे गाव वसलेले आहे. जेमतेम ५०० लोकवस्ती आहे.४पावसाळ्यात येथील ग्रामस्थ जीव मुठीत धरून राहातात. कारण भूस्खलनाची भीती त्यांना नेहमीच सतावत असते. सन २००५ साली डोंगराच्या पायथ्याशी ५ फूट खोल, ३ मीटर रुंद तर ५ किमी लांबीची भेग जमिनीला पडली होती. ४शासनाने भूवैज्ञानिकांचे पथक पाठवून पाहाणी करून अहवाल तयार करण्यास सांगितले होते. या पथकाने दोन आठवडे अभ्यास करून या गावाला भूस्खलनाचा धोका असून गावाचे पुनर्वसन करण्याचा अहवाल सादर केला.४राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने सुरक्षित ठिकाणी १०० घरे बांधून देण्याचे काम सुरू केले होते. परंतु निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले व ते देखील अर्धवटच़९ फेब्रुवारी २०१५ रोजी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाबरोबर तळमाचीवाडीच्या पुनर्वसनासाठी झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी यांनी तहसीलदारांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी सूचना केल्या होत्या. परंतु याबाबत केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीही झाले नाही. पुनर्वसनाच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. परंतु शासनाने वा लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांच्या या मागणीची जराही दखल घेतली नाही. शासनाच्या दिरंगाईने पुनर्वसनाचे घोंगडे इतकी वर्षे भिजतच पडले आहे.