पुणे : या शासनाने पन्नास खोके खाल्ले, आता औंध जिल्हा रुग्णालयातील 85 एकरचा भूखंडाचा श्रीखंड खाण्याचा डाव आखला आहे. त्यांचा हा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही, सर्वसामान्यांची आरोग्य सेवा कधीही विकू देणार नाही, असे आंदोलन शहर शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) जिल्हाधिकारी कार्यलयासमोर केले. या आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, अनंत रामचंद्र घरत व कार्यकर्ते उपस्थित होते. तानाजी सावंतचे करायचे काय, खाली डोके वर पाय, भूखंडाचा श्रीखंड खान्याचा प्रयत्न करणारे तानाजी सावंत राजीनामा द्या अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला होता.
पुण्यातील औंध रूग्णालयाचे खासगीकरण करून 85 एकर जमिन गिळंकृत करण्याचे खूप मोठ षडयंत्र आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रचले आहे. याचा निषेध करण्यासाठी व हा निर्णय हाणून पाडण्यासाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवतीसेना, अंगिकृत संघटनेतील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.