पिंपरी : दमबाजी केल्याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल झाली. त्यामुळे वाढणा:या कटकटी लक्षात घेऊन दोन दिवसांपासून अतिरिक्त आयुक्त शिंदे महापालिकेत अनुपस्थित आहेत.
तानाजी शिंदे यांनी बिल्डर मित्रचे हितसंबंध जोपासण्यासाठी पिंपरीतील एका उद्योजकाला जागा खाली करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त शिंदे यांनी धमकावल्याची चर्चा आहे. बिल्डर मित्रसाठी एका उद्योजकाचे कार्यालय पाडण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला कारवाई करण्यास पाठविण्याचे उद्योग त्यांनी केले आहेत.
अतिरिक्त आयुक्त पदावरील व्यक्ती थेट मोबाईलवरून धमकी देते, हे कोणाला सांगितले असते, तर कोणी विश्वास ठेवला नसता; परंतु हे वास्तव दुस:या एका घटनेतून पुढे आले आहे.
शिंदे यांच्यामुळे त्रस्त झालेल्या या तरुण उद्योजकाने न्यायालयीन मार्गाने त्यावर तोडगा काढला. शिंदे यांचे असे अनेक कारनामे पुढे येतील, असे मत त्या उद्योजकाने व्यक्त
केले. (वार्ताहर)