दरम्यान, शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात पहिला सीए होण्याचा मान मिळाल्याच्या आनंदाच्या प्रीत्यर्थ न्हावरे येथील ग्रामस्थांनी तान्हाजी देशमुख यांची सवाद्य मिरवणूक काढून येथील श्रीमल्लिकार्जुन मंदिरात भव्य सत्कार केला.
तान्हाजीचे प्राथमिक शिक्षण न्हावरे परिसरातील भोंडवेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयात आणि उच्च माध्यमिक शिक्षण शिरूरच्या सीटी बोरा महाविद्यालयात झाले. बारावीत असताना त्यांनी अकाऊंट या विषयात ९८ गुण मिळवून तालुक्यात पहिल्या क्रमांंकाचे यश प्राप्त केले होतेे. याचवेळी त्यांंनी सीए होण्याचा निश्चय केला. त्यानंतर पदवीचे शिक्षण पूर्ण करत सीए परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दोन वेळा परीक्षेत अपयश आले मात्र खचून गेलो नाही, नाउमेद झालो नाही. त्यादरम्यान इतर विद्यार्थ्यांचा पेहराव, त्यांच्या चारचाकी गाड्या त्यांच इंग्लिश बोलण त्यांच्याकडे पाहून मनात थोडा न्यूनगंड निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत आईवडील, भाऊ, भावजय यांनी धीर देऊन पाठबळ दिले. त्यानंतर आपण अभ्यास केला तर यश निश्चित मिळेल व स्वप्न सत्यात उतरेल, असे तान्हाजी देशमुख यांनी सांगितले.
०४ न्हावरे