काऱ्हाटी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. शेतातील चारा पिके वाचवण्यासाठी टँकरने विकत पाणी घेण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे जानाई शिरसाई योजनेतून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.काऱ्हाटी, जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, भिलारवाडी, माळवाडी, फोंडवाडा आदी परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. शेतात असणारी पिके वाचवण्यासाठी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी तीन-चार किलोमीटर पायपीट लागत आहे. तसेच जनावरांना क्षारयुक्त पाणी पाजावे लागत आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. वाड्या-वस्त्यांवरील विहिरी कोरड्या पडल्या आहेत.
पिकांसाठी टँकरने पाणी
By admin | Published: April 27, 2015 4:50 AM