शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

टंचाई आराखड्याची मुदत संपल्याने बारामतीत टँकर बंद

By admin | Published: August 10, 2016 1:40 AM

तालुक्यातील जिरायती भागात अद्यापही पाणी टंचाईची समस्या गंभीर आहे. मात्र टंचाई आरखड्याची मुदत जुलै अखेर संपल्याने प्रशासनाने १३ टँकर कमी केले आहेत.

बारामती : तालुक्यातील जिरायती भागात अद्यापही पाणी टंचाईची समस्या गंभीर आहे. मात्र टंचाई आरखड्याची मुदत जुलै अखेर संपल्याने प्रशासनाने १३ टँकर कमी केले आहेत. तर टँकर बंद केल्याने पंचायत समितीचे सभापती यांनी प्रशासकिय अधिकाऱ्यांवर टिका करताना हा निर्णय दुर्दैवी असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बारामती तालुक्यात सध्या २० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एकूण १६ गावे व १४६ वाड्यावस्त्यांवरील ४१ हजार ६७५ लोकसंख्येला ७० खेपांनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्हाभर पडणाऱ्या पावसाने बारामती तालुक्याच्या जिरायती भागाकडे नेहमीप्रमाणे पाठ फिरवली आहे. या भागात एकही दमदार पाऊस झाला नाही. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे. त्यात प्रशासनाने टंचाई आराखड्याच्या मुदतीचे कारण पुढे करीत टँकर बंद केल्याने या भागातील परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. जिरायती भागात बंद झालेले टँकर लवकर सुरू कारवेत अशीच आमची मागणी आहे. तालुक्यातील जराडवाडी, उंडवडी कडेपठार, साबळेवाडी, सोनवडीसुपे, शिर्सुफळ, बाबुर्डी, मोराळवाडी, तरडोली, मुर्टी, अंजनगाव, सायबाचीवाडी, काऱ्हाटी, काळखैरवाडी, देऊळगाव रसाळ, जळगाव सुपे, पानसरेवाडी, कारखेल, खराडेवाडी, कोळोली, उंडवडी सुपे, कुतवळवाडी, दंडवाडी, भोंडवेवाडी, नारोळी आदी गावांसह वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.