केदार कदम
पाषाण : स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट बाणेर, बालेवाडी, औंध प्रभागांतील जनतेला पाणीटंचाईमुळे उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. जानेवारीनंतर हळूहळू सुरू झालेल्या पाणीटंचाईने आता उग्र रूप धारण केले आहे. स्मार्ट सिटीमध्ये समावेश असणाऱ्या भागांमध्ये पाण्यासारखी मूलभूत समस्यादेखील सोडवली गेली नसल्यामुळे स्मार्ट सिटी योजनेचा पोकळपणा प्रकर्षाने पुढे येत आहे.
बाणेर, बालेवाडी, औंध परिसरातील अनेक सोसायट्यांना लाखो रुपये खर्च करून पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत. कारण औंध, बाणेर, बालेवाडीमधील अनेक सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून पालिकेच्या टँकरसह खासगी टँकरची मागणी वाढली आहे. औंधमधील मध्यवर्ती भागात नियमित येणारे पाणी जवळपास ७0 टक्क्यांपर्यंत कमी दाबाने येत आहे.सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले, की पालिकेचे टँकर दिवसाआड येत असल्याने खाजगी टँकरवरच विसंबून राहावे लागत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस होणारी पाणीटंचाईची तीव्रता पाहता मे अखेरपर्यंत मात्र पुरती दमछाक होणार असल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये खाजगी टँकरवाल्यांची चांदी झाली आहे. त्यांच्याकडून ग्राहकांची लूट होत आहे.सोसायट्यांना पाण्याचे टँकर मागवण्यासाठी बराच मोठा खर्च करावा लागत असल्याने सर्वच रहिवाशांना याचा अधिक आर्थिक भार उचलावा लागत आहे.मागणी वाढल्याने त्यामागील आर्थिक गणिते बदलताना दिसत आहेत. चतु:शृंगी पंपिंग स्टेशनवरून दिवसाला दोनशेपेक्षा जास्त टँकरच्या फेºया होत असल्याचे येथील नियंत्रकांनी सांगितले. शिवाजीनगर, मुळा रोड, खैरेवाडी, औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी या भागातील बहुतांश नागरिकांना या स्टेशनवरून टँकरचा पुरवठा केला जातो.दिवसाला येथून २०० ते २२५ टँकर भरले जातात. यामध्ये पालिकेचे १८, निविदा काढून सुरू केलेले १३५ व चलन पासचे ३५ पेक्षा जास्त खासगी टँकर येथून भरले जातात. खासगी टँकरचे येथून पाणी भरण्याचे दर ४९७ रुपयांप्रमाणे आहेत. परंतु नागरिकांना मात्र याच टँकरसाठी हजार ते बाराशे रुपये मोजावे लागत आहेत. साडेसहाशे ते सातशे रुपयांना मिळणारा पाण्याचा टँकर बाराशे ते तेराशे रुपयांपर्यंत दिला जात आहे.पुण्यात २४ बाय ७ पाण्याची योजना जाहीर करण्यात आली असली तरी यंदाच्या उन्हाळ्यात मात्र नागरिकांना चोवीस तास पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागणार आहे .उन्हाळ्यात पाण्याचा व्यवसाय तेजीत येणार असल्याचे दिसून येत असून यातून नागरिकांची पिळवणूकच होणार आहे.बाणेर बालेवाडी परिसरातील सोसायटीमध्ये लागणाºया टँकरच्या खर्चाचे बिल पालिकेने अदाकरावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.२४ बाय ७ पाणीपुरवठा आहे कुठे ?१ २४ बाय ७ पालिकेने दिलेल्या पाणीपुरवठा कंत्राटाचे काम व्यवस्थित होत नसल्यामुळे औंध येथील अनेक सोसायट्यांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. नगरसेविका अर्चना मुसळे यांनी पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासंदर्भात बुस्टर पंप बसवण्याच्या सूचना पालिकेला सुचवल्या होत्या. परंतु याबाबत कोणतीच कारवाई कंत्राट मिळालेल्या एलअँडटी कंपनीने केली नाही.२ या संदर्भात परिसरातील नागरिकांनी एल अँड टी कंपनीच्या औंध येथील कार्यालयात नगरसेविका अर्चना मुसळे व मधुकर मुसळे यांच्या नेतृत्वाखाली एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. या वेळी काही तांत्रिक कामामुळे दिरंगाई होत आहे, असे एल अँड टीच्या अधिकाºयांनी सांगितले. परंतु ३ महिन्यांपूर्वी सुरळीत असलेला पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने संतप्त नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या वेळी औंध परिसरातील नागरिकांनी वेळेत काम पूर्ण करण्याची मागणी केली.जानेवारीतीलटँकरची मागणी ९९मार्चअखेर टँकरची मागणी२२५ ते २५०खासगी टँकरचे पंपिंगस्टेशनवरील दर ४९७ रु.नागरिकांसाठी खासगी टँकरचे दर८०० ते १२०० रु.परिसरातील नागरिकांनी एल अँड टी कंपनीच्या औंध येथील कार्यालयात नगरसेविका अर्चना मुसळे व मधुकर मुसळे यांच्या नेतृत्वाखाली एल अँड टी कंपनीच्या अधिकाºयांना जाब विचारला.