असून शासकीय किंवा खासगी टँकरने पाणीवाटप करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी दिली.
.
कुरवंडी अंतर्गत मतेवाडी, गटेवाडी कोंबडवाडी,दरावस्ती, बारवेवस्ती येथे ९००० लि.क्षमतेचे प्रतिदिन ४ खेपा, थुगाव अंतर्गत गावठाण,कोल्हारवाडी येथे ९००० लि.क्षमतेचे प्रतिदिन ४ फेऱ्या,पाटण अंतर्गत पिंपरी येथे ९०००लि.क्षमतेचे प्रतिदिन १ फेरी, पाटण अंतर्गत साकेरी येथे ९००० लि.क्षमतेचे प्रतिदिन १ फेरी, माळीण, आमडे गावठाण येथे ९००० लि.क्षमतेचे प्रतिदिन २ फेऱ्या, आसाणे अंतर्गत मेनुंबरवाडी,भांगलेवाडी, कुंभेवाडी,ढवळेवाडी,जांभळेवाडी येथे ९००० लि.क्षमतेचे प्रतिदिन २ फेऱ्या, वडगावपीर अंतर्गत वाड्या-वस्त्या येथे ९०००लि.क्षमतेचे प्रतिदिन २ फेऱ्या, मांदळेवाडी येथे गावठाण व वाड्यावस्त्या येथे ९००० लि.क्षमतेचे प्रतिदिन २ फेऱ्या, पारगाव तर्फे खेड अंतर्गत वाड्यावस्त्या येथे ९००० लि.क्षमतेचे प्रतिदिन ५ फेऱ्या, आहुपे अंतर्गत गावठाण, बालवीरवाडी, वनदेववस्ती येथे ९००० लि. क्षमतेचे प्रतिदिन ४ फेऱ्या, तळेघर अंतर्गत गावठाण, खाडेवाडी, म्हातारदरी, तिटकारेवस्ती येथे ९००० लि.क्षमतेचे प्रतिदिन २ फेऱ्या, फलोदे अंतर्गत गावठाण, नंदेचीवाडी,
उतळेवाडी, मुदगुनवाडी, लिंबोणीचीवाडी येथे ९००० लि.क्षमतेचे प्रतिदिन १ फेरी केली जाईल. टॅंकरने पाणीवाटप करताना गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या स्रोतामधून पाणीवाटप करावे किंवा ग्रामपंचायतने पाणीटाकी खरेदी करून त्यावर प्रकिया करून पाणीवाटप करावे. कोविड-१९ या संसर्गजन्य साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ पाणीपुरवठा होईल याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपसभापती संतोष भोर यांनी केले आहे.