बारामती/पुणे - मागील काही दिवसांपूर्वी लस घेतलेल्या तन्मय फडणवीस यांचा लसीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. तन्मय यांनी हेल्थकेअर वर्कर म्हणून लस घेतल्याचे उघड झालें आहे. सोमेश्वरनगर (ता.बारामती )येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीमध्ये हि बाब उघड झाली आहे.यादव यांनीच हि भांडेफोड केली आहे.
तन्मय फडणवीस हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे सख्ये नातु आहेत.काही दिवसांपुर्वी कोरोनावरीस लस वयाच्या बंधनात बसत नसतानाही त्यांनी घेतली होती. तन्मय यांच्या ट्विटर अकौंटवर पाहीले तर त्यांनी अभिनेता असल्याचे नमुद केले आहे.परंतु राज्य सरकारकडे लस घेत असताना हेल्थकेअर वर्कर म्हणुन त्यांनी उल्लेख केला असल्याची माहिती यादव यांना माहीती अधिकारात अघड झाली आहे. यादव यांनी ही माहिती मागवली होती.
तन्मय फडणवीस हे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे व माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे सख्ये नातु. काही दिवसांपुर्वी कोरोनावरीस लस वयाच्या बंधनात बसत नसतानाही त्यांनी घेतली होती. तन्मय यांच्या ट्विटर अकौंटवर पाहीले तर त्यांनी अभिनेता असल्याचे नमुद केले असुन काही मालिकांमध्ये त्यांनी प्रत्यक्षात भुमिकाही साकारली आहे. परंतु राज्य सरकारकडे लस घेत असताना हेल्थकेअर वर्कर म्हणुन त्यांनी लस घेतली आहे.
एकीकडे देशात मोठ्या प्रमाणात लसीचा तुडवडा असताना अशा पद्धतीने लस घेणे कितपत योग्य आहे, हा मोठा प्रश्न या निमित्ताने पडतो.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस वेळोवेळी नैतिकतेच्या व नियमांच्या गप्पा मारतात. आता तन्मय फडणवीस यांना ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे, अभिनेते की हेल्थकेअर वर्कर म्हणुन त्यांना लस देण्यात आली. याबद्दल नेमके खर सांगु शकतील, असा सवाल यादव यांनी केला आहे.