शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 18:07 IST

'पाच दशकांहून अधिक काळ नाटक, लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला यांच्या अभ्यासात रमलेल्या भवाळकर यांनी लोकसंस्कृती तसेच स्त्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन करून मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले

ठळक मुद्दे१३, १४ आणि १५ एप्रिलला आळंदीत होणार संमेलन मराठी विश्वकोश,मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्वाच्या कार्यातही बहुमोल योगदान

पुणे : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक आणि लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या व्यासंगी अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन १३, १४ आणि १५ एप्रिल रोजी आळंदी येथे होणार आहे. अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे विश्वस्त आणि साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. 'पाच दशकांहून अधिक काळ नाटक, लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला यांच्या अभ्यासात रमलेल्या भवाळकर यांनी लोकसंस्कृती तसेच स्त्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन करून मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. त्यांनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशा नाट्य प्रकारांची जडणघडण शोधली. त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ, चिकित्सक दृष्टी आणि सैद्धांतिक अभ्यासाचा वस्तुपाठ ठरावा असे आहे. मराठी विश्वकोश,मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्वाच्या कार्यातही त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे. डॉ. श्रीधर व्यकंटेश केतकर, वि. का. राजवाडे,धमार्नंद कोसंबी, दुर्गाबाई भागवत, डॉ. रा. चिं. ढेरे या महाराष्ट्रातील व्रतस्थ ज्ञानोपासकांचे ऋण मानणा-या भवाळकर यांनी त्यांची परंपरा समर्थपणे पुढे चालवली आहे. अशा व्रतस्थ लेखिकेची पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड करताना मनात आनंदाची आणि समाधानाची भावना आहे, असे लक्ष्मीकांत देशमुख आणि प्रा. मिलिंद जोशी यांनी म्हटले आहे. ....................    डॉ. तारा भवाळकर यांची ग्रंथसंपदा मायवाटेचा मागोवा, यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा, महामाया, मिथक आणि नाटक, लोकनागर रंगभूमी, लोकसंचित, स्त्री मुक्तीचा आत्मस्वर, माझिये मातीचा, मराठी नाट्यपरंपरा :शोध आणि आस्वाद, मधुशाला (हरिवंशराय बच्चन यांच्या काव्याचा स्वछंद अनुवाद), लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा, मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे, लोकांगण, लोकसाहित्य : वाड्मयप्रवाह , प्रियतमा (गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा) 

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीMilind Joshiमिलिंद जोशी