महूडे (पुणे): भोर तालुक्यात एक नवीन पॅटर्न तयार झाला आहे. कोणतीही नवीन विकास कामे मंजूर झाली तर ती मीच केली असे काहीजण सांगत सुटतात. परंतु तालुक्यातील जनता आता एवढी वेडी राहिली नाही त्यांना नेमकी कामे कोणी केली आहेत हे त्यांना समजते दिशाभूल करण्याचे काम जास्त काळ चालणार नाही असा टोला संग्राम थोपटे (sangram thopate) यांनी विरोधकांना लगावला.
आ. थोपटे म्हणाले, काँग्रेस पक्षाने केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहचवून विरोधकांची बोलती बंद करा. काँग्रेस पक्षाला परंपरा आहे. सुसंस्कृत कार्यकर्ते या पक्षात आहेत. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, महिला अध्यक्ष गीतांजली शेटे, मा. जिल्हा परिषद सदस्य गीतांजली आंबवले, नगरसेवक चंद्रकांत मळेकर, अनीलनाना सावले,विठ्ठल कुडले, धनंजय वाडकर, आनंदराव आंबवले, संदीप आंबवले, विजयबापू शिरवले, शिवाजी सासवडे,सरपंच तानाजी कुडपने, उपसरपंच अंकुश राजीवडे, गोरख मानकर, अमित दरेकर, प्रमोद थोपटे यांच्यासह आंबवडे खोऱ्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.