शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
3
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
4
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
6
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
7
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
8
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
9
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
10
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
11
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
12
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
13
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
14
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
15
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
16
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
17
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
18
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
19
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
20
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले

Tasty Katta: भरपूर बटर लावून गरम अन् कोथिंबिरीची पखरण केलेला 'मसाला पाव'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 1:38 PM

पावभाजी नव्हे, पण त्यासारखेच खाणाऱ्या खवय्यांसाठी मसाला पाव म्हणजे पर्वणीच ठरतो

राजू इनामदार

पुणे : पाव नका रे खाऊ, पोट बिघडेल, सतत असे सांगणाऱ्यांना पावाचा महिमा माहितीच नसतो. वेळेला पोट भरवणारा, शिवाय तोंडाला चव आणणारा असा हा पाव कितीही बदनामी झाली तरीसुद्धा खवय्याच्या विश्वात आपले वेगळे स्थान टिकवून आहे.

फर्ग्यूसन रस्त्यावरचा हा मसाला पावही असाच आहे. कीर्ती नावाच्या ज्यूसबार मध्ये तो मिळतो. पावभाजी तर नको, पण काहीतरी त्यासारखे खायचे आहे, अशांसाठी तर हा मसाला पाव म्हणजे पर्वणीच आहे. तो काही इतर मसाला पावासारखा पावात भाजी भरलेला नाही. तो झाला भाजीपाव. हा खराखुरा मसाला पाव आहे.आले, लसूण यांचा खास मसाला त्यासाठी वापरण्यात येतो. कोथिंबीर, कच्चा कांदा, लिंबू हे सगळे असतेच. पण त्याशिवाय त्याच्यामध्ये उकडलेल्या बटाट्याचे अगदी पातळ स्लाईस टाकण्यात येतात. खरी मजा या स्लाईसचीच आहे. ते अगदी छान मऊसूत अन् पावाच्या आत व्यवस्थित बसवलेले असतात.

हा मसाला पाव भरपूर बटर लावून तव्यावर गरम केला जातो. एरवीचा पावभाजीचा पाव गरम करतात तसाच. सर्व्ह करताना तो डिशमधून परत त्यावर ताजी कोथिंबिरीची पखरण केलेली असते. दिसताक्षणीच हा मसाला पाव तोंडाला पाणी आणतो. फक्त मसाला पाव खाण्यासाठी म्हणून कीर्तीमध्ये कितीतरी जण येतात, असे संचालक तुषार पाटील सांगतात. त्यांच्या वडिलांनी १९७३ मध्ये कीर्ती सुरू केले. त्याची कीर्ती आता खवय्यांमध्ये सर्वदूर पोहचली आहे.

कुठे- फर्ग्यूसन कॉलेज रस्त्यावरकधी खाल- दुपारी १२ ते रात्री ११काय खाल- मसाला पाव, सर्व फळांचे ज्यूस, पावभाजी

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नHealthआरोग्यSocialसामाजिक