शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

करवसुलीचे उद्दिष्ट असफल

By admin | Published: April 02, 2015 5:47 AM

एलबीटी बंद झाल्याने सर्वाचे लक्ष मिळकतकराकडे होते. करसंकलन विभागाने २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये ३९७.५० कोटींचा टप्पा पार केला आहे.

पिंपरी : एलबीटी बंद झाल्याने सर्वाचे लक्ष मिळकतकराकडे होते. करसंकलन विभागाने २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये ३९७.५० कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र, ४९२ कोटी करवसुलीचे उद्धीष्ठ गाठू शकले नाहीत. सुमारे १०० कोटी थकीत कर राहिला आहे.मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी जास्त मिळकतकराची थकीत रक्कम वसूल करण्यात आली आहे. ८२ हजार मिळकत थकबाकीदारांना नागरिकांना या वेळी जप्तीच्या नोटीस पाठविल्या होत्या. एकूण ४ लाख ७ हजार ९२० मिळकती आहेत. सर्वांत जास्त थेरगाव भागातील ७७ कोटी रुपये, सांगवी ४५ कोटी, भोसरी ४२ क ोटी, चिंचवड ३५.९० कोटी, पिंपरी वाघेरे २८ कोटी, तर चिखली २६ कोटी रुपये मिळकतकर वसूल झाली आहे. अवैध बांधकाम शास्तीकर वगळून ३८ हजार ३५८ मिळकतधारकांनी मूळ मिळकतकराचा ७२.९५ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. ३१ मार्च अखेर सर्वाधिक ९.७५ कोटी रुपयांची मिळकत कर वसूल झाला. गतवर्षी ३०७ कोटी मिळकत कराची वसुली झाली होती. मागील वर्षापेक्षा या वर्षी ९०.५० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या वर्षी एकूण ३,०६,२८२ मिळकतधारकांनी मि़ळकत कराचा भरणा केला आहे. आॅनलाइन गेटवे पेमेंटचा मोठा वापर केला आहे, असे सहायक आयुक्त भानुदास गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, ३१ मार्च रोजी कर संकलन विभागाची सर्व कार्यालये उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)