अतुल चिंचली-पुणे: दरवर्षी शाळांमध्येशिक्षक दिन उत्साहात साजरा केला जातो. त्यादिवशी बहुतांश शाळेत दहावीचे विद्यार्थी इतर इयत्तेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देतात. तसेच उत्तम कामगिरी केलेल्या शिक्षकांचे सत्कारही होतात. अशा प्रकारचा शिक्षक दिन यंदा ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे उत्तम शिक्षक होते. म्हणून त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांनी ऑनलाईन शिक्षक दिन साजरा करण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने लोकमतने शाळेतील मुख्याध्यापकांशी संवाद साधला. बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे म्हणाल्या, शिक्षक दिनाला झूम मिटिंगचे नियोजन केले आहे. दहावीच्या मुलांचा अभ्यास आणि टेस्ट चालू असल्याने ते सहभागी होणार नाहीत. यंदा नववीचे विद्यार्थी सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे तास घेणार आहेत. तर आठवीचे विद्यार्थी पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांचे तास घेणार आहेत. प्रत्येक विद्यार्थी पंधरा मिनिटांचा एक तास घेईल. त्यामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती सांगणे, मनोरंजनात्मक गोष्टी सांगणे, अभ्यास शिकवणे. अशा गोष्टी केल्या जातील. ...................................................................शाळेत टीम अँपच्या वीस मिनिटांच्या तासाचे आयोजन केले आहे. सकाळी ८ ते ५ या शाळेच्या वेळेत दहावीचे विद्यार्थी तास घेणार आहेत. दहावीच्या मुलांकडून इतर शिक्षकांनी पीपीटी तयार करून घेतली आहे. त्याचे नियोजन एक तारखेपासून चालू होते. त्याद्वारे दहावीचे विद्यार्थी इतर इयत्तेतील विद्यार्थ्यांना शिकवतील. दरवर्षी नववीत पहिला येणारा विद्यार्थी शिक्षक दिनाच्या दिवशी शाळेचा मुख्याध्यापक असतो. त्याचप्रमाणे रोटरी क्लबच्या वतीने आदर्श पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शासनाचे नियम पाळून ७, ८ लोकांमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. दिलीप रावडे मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कुल रमणबाग .. ................................................................शिक्षकांना शिक्षकांमधून प्रेरणा मिळत असते. त्यादृष्टीने काही शिक्षक प्रेरणा मिळालेल्या शिक्षकांबद्दल मनोगत व्यक्त करतील. विद्यार्थ्यांसाठी मनोगताचे व्हिडिओ शाळेच्या ग्रुपवर टाकण्यात येणार आहेत. दरवर्षी दहावीचे विद्यार्थी शिक्षक होतात. यंदा हे विद्यार्थी आवडत्या शिक्षकाबद्दल निबंध, माहिती, त्यांचे अनुभव लिहून पाठवणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना नंतर शाळेकडून पुस्तके भेट दिली जाणार आहेत. यंदा शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या हस्ते शाळेतील शिक्षकांचे सत्कार केले जाणार आहेत. शाळेच्या पटांगणात सोशल डिस्टनसिंग पाळून हा कार्यक्रम पार पडेल. भारत वेदपाठक, सचिव , दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी
शिक्षक दिन विशेष : वरच्या वर्गातली मुले होणार खालच्या वर्गातल्या मुलांचे ऑनलाईन 'गुरुजी'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 11:51 AM
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांनी ऑनलाईन शिक्षक दिन साजरा करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देशिक्षक दिनाला झूम मिटिंगचे नियोजनशाळेत टीम अँपच्या वीस मिनिटांच्या तासाचे आयोजन